निंभोरा प्रतिनिधी / परमानंद शेलोडे
रावेर :- तालुका रावेर येथील रेणुका शिक्षण प्रसारक संस्था संचलित सौ.डी .आर .चौधरी माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले या सप्तरंग कलाविष्कार स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांची उधळण करून उपस्थितांची दाद मिळवली
यावेळी संस्थेचे संचालक श्री. नरेंद्रशेठ ढाके, चेअरमन श्री.ज्ञानदेव नेमाडे ,श्री.सुधाकर भंगाळे, श्री.प्रमोद भोगे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.सायरा खान मॅडम यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनंदा बिऱ्हाडे, सौ.शाहीन दस्तगीर खाटीक ओबीसी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्री.सुनीलभाऊ कोंडे,श्री.दस्तगीर खाटिक,श्री. परमानंद शेलोडे व इतर मान्यवरां सोबत शाळेच्या मुख्याध्यापक सायरा खान मॅडम तसेच शिक्षक- शिक्षकेतर वृंद तसेच पालक वर्ग व परिसरातील अबाल वृद्ध नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी ,अहिराणी भाषेतील गीतांवर धमाल नृत्य सादर केले याशिवाय देशभक्तीपर गीते व समाज प्रबोधन पर विषयांवर बेटी बचाव – बेटी पढाव ,बालविवाह व व्यसनमुक्ती नाटिका सादर केल्या तसेच लावणी, पोवाडा,भीम गीत , फॅन्सी डान्स,एकांकिका,विनोदी गीत,सिनेगीत, लेझीम असा विविध रंगी कार्यक्रम सादर करण्यात आला.
विशेष खास बाब म्हणून विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नशा मुक्ती व बालविवाह प्रथा सादर केलेल्या नाटकाला प्रेक्षकांनी व पालकांनी भरभरून दाद दिली काही गाण्यांवर विद्यार्थी विद्यार्थिनींनी केलेल्या अभिनयाला उपस्थित विद्यार्थी व पालक देखील थिरकताना दिसून आले. या विविध सुप्त कलागुणांच्या अविष्कारावर प्रमुख पाहुण्यांसह विविध मान्यवरांनी गौरवपर रोख बक्षीसही दिली .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्रकुमार दोडके सर व गोकुळ भोईसर यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती हेमलता नेमाडे मॅडम,श्री.चंद्रकांत देशमुख सर,श्री नरेंद्रकुमार दोडके सर,श्री गोकुळ भोई सर,श्री सरफराज तडवी सर व श्री.उदय अवसरमल सर,श्री.गौरव नेमाडे , श्री.मुकुंदा फालक,श्री.तुषार भंगाळे तसेच इतर वर्ग आदींचे सहकार्य लाभले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सायरा खान मॅडम यांनी सर्वांचे मनपुर्वक आभार मानले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.