पाळधी जवळ महामार्गावर मोटारसायकलला डंपरची धडक, झुरखेड्याची ३७ वर्षीय विवाहिता जागीच ठार , चालक गंभीर

Spread the love

दोन्ही झुरखेड्याचे रहिवासी , डंपर चालक फरार , पोलिसांनी डंपर घेतले ताब्यात

गौरवकुमार पाटील / अमळनेर

पाडळसरे येथील माहेरवासिनी व झुरखेड्याची रहिवासी असलेल्या ३७ वर्षीय विवाहिता कविता प्रशांत चौधरी ह्या लग्नानिमित्त जळगावी कृषिकेन्द्र चालक विलास देविदास चौधरी यांच्यासोबत मोटारसायकलने जातं असतानाच पाळधीच्या पुढे गोविंदा हॉटेलसमोर भरधाव वेगाने मागून येणाऱ्या डंपर क्रमांक GJ-03 , BY-6831 ने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार विलास चौधरी व सौ कविता प्रशांत चौधरी हे जागीच फेकले जाऊन डंपरचे चाक कविता चौधरी यांच्या दोन्ही पायांवरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला

तर विलास चौधरी यांच्या डोक्याला ,पाय व डोळ्यात गंभीर जखमी दुखापत अवस्थेत जळगावी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले , त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत ,ही घटना आज दिनांक १३ रोजी दुपारी घडली ,
त्यात कविता चौधरी यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते तेथे डॉक्टरांनी तीस मृत घोषित केले ,

मृतदेह शवविच्छेदन करून दिनांक १४ रोजी झुरखेडा येथे सकाळी ८ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत , मृत कविता चौधरी ह्याचे पाडळसरे येथील माहेर असल्याने त्या कळमसरे शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी मधुकर गुर्जर यांच्या कन्या तर पाडळसरेचे पोलीस पाटील उमाकांत पाटील यांच्या भगिनी आहेत , घटना कळताच पाडळसरे ,झुरखेडा व पाळधी येथील नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी पाळधी औट पोस्टचे पोलिसांनी डंपर ताब्यात घेऊन पेट्रोल पंप परिसरात जमा केले आहे.मात्र डंपर चालक फरार झाला असल्याचे पाळधी औट पोस्टच्या पोलिसांनी सांगितले , सौ कविता चौधरी यांच्या पश्चात पती व १४ वर्षे वयाचा सत्यम व १२ वर्षे वयाची भूमिका ही दोन मुले असून ,पाडळसरे येथे आईवडील ,भाऊ असा परिवार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार