गौरवकुमार पाटील / अमळनेर
तालुक्यातील दहिवद येथे चौक सुशोभीकरणांतर्गत आमदार निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक बांधण्यात आले त्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम अमळनेरचे आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते काल संपन्न झाला. दहिवद येथील ग्रामपंचायत चौकात मोक्याच्या ठिकाणी स्मारक निर्माण झाल्यामुळे गावातील धनगर बांधवांनी प्रवेश द्वारा जवळच आमदार अनिल दादा पाटील यांना पिवळा फेटा, घोंगडी व काठी देऊन सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीच्या सुरुवातीला गावातील तरुणींनी पिवळा पोशाख परिधान करून हातात महादेवाची पिंड घेऊन आमदारांना असंख्य ग्रामस्थ महिला भगिनी यांच्या उपस्थितीत सभामंडपात आणले.त्यावेळी दीपप्रजलानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोक तुळशीराम पाटील होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे लोकार्पण भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते तर डी. ए. धनगर सर, बन्सिलाल भागवत सर व असंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे आदर्श राज्यकारभाराचे उत्तम उदाहरण आहे.

तसेच त्यांनी अनेक समाज उपयोगी कार्य केले. त्यांनी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. असे गौरवोद्गार उद्घाटक आ. अनिल दादा पाटील यांनी काढले. यावेळी मौर्य क्रांती संघाचे बन्सिलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, अहिल्यादेवी होळकरांनी सती प्रथा बंद केली. डी ए धनगर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गावागावातील पायविहिरी आजही अहिल्यादेवींच्या कार्याची साक्ष देत आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोक तुळशीराम पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी खास धनगरी वेश परिधान केलेले आधार लांडगे व गुलाब धनगर ,गोपीचंद शिरसाठ, रमेश देव शिरसाठ, चेतन देवरे, गावातील ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटी सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामकृष्ण धनगर, खंडू धनगर, संभाजी धनगर , अशोक धनगर वासुदेव धनगर, रमेश धनगर, ज्ञानेश्वर धनगर,सुनील धनगर, संतोष धनगर, बाळासाहेब धनगर, रावसाहेब धनगर, गणेश धनगर, रामकृष्ण धनगर, सतीश धनगर, भालचंद्र धनगर, हरी धनगर, बापू धनगर, किरण धनगर, दत्तू धनगर, गणेश धनगर, सुरेश धनगर, विलास धनगर, संतोष धनगर, हेमंत धनगर, धिरज धनगर, सुहास धनगर, गौरव धनगर, प्रितम धनगर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमानंतर खंडू राघो धनगर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.
हे पण वाचा
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.