बर्निंग कारचा थरार ; काळाचा घाला थोडक्यात हुकला ; आणि भावी नवरदेवासह पाच जण बालंबाल बचावले , दैव बलवत्तर म्हणून.

Spread the love

कजगाव ता.भडगाव :- काळ आला होता पण वेळ आली नव्हती असाच काहीसा प्रसंगाला तोंड देऊन एक भावी नवरदेव गाडीला लागलेल्या आगीतून थोडक्यात बचावला व एकच सुटकेचा निश्वास सोडला याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव चांदवळ रस्त्यावर कजगाव व पासर्डी गावाच्या मधोमध एका चारचाकी धावत्या वाहनाला आग लागली आणि एकच पळापळ सुरू झाली आणि त्यात असलेले नवरदेव व त्यांच्या सोबतीच्या लोकांनी प्रसंगवधान राखून वेळीच गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून साक्षात मृत्यूच्या जबड्यातून सुटका करून घेतली

अमरावती येथील रोहन हरि डेंडुळे यांचे आज मालेगाव येथे लग्न होते. त्यासाठी ते नातेवाईकांसह एम.एच.२७ बी.व्ही.७९५६ या इनिव्हा गाडीने निघाले होते.आणि भल्या पहाटे गाडीमध्ये वायर जळाल्याचे चालकाच्या लक्षात आले. गाडी रस्त्याच्या बाजूला घेत असतानाच कारने पेट घेतला चालकाने लागलीच कारमधील पाचही जणांना खाली उतरवले आणि काही मिनिटातच कार जळून खाक झाली कार ला लागलेली आग विझवण्यासाठी रस्त्यावर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने कार काहि मिनिटांत जळुन खाक झाली आगीचे लोड मोठ्या प्रमाणावर उसळत होते व आजूबाजूला जळणाऱ्या आगीमुळे प्रचंड धुळीचे वातावरण निर्माण झाले होते .

यावेळी काही वेळ वाहतून खोळंबल्याचे दिसून आले नवरदेव सह त्या गाडीतील प्रवासी नीशब्ध होत जळणारी गाडी पहात आपण सुदैवाने वाचलो आणि दुसऱ्या गाडीने पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले यावेळी नवरदेव रोहन डेंडुळे यांच्या सोबत आकाश शिवदास डेंडुळे, पूजा आकाश डेंडुळे, वैशाली अमर बागरे, आणि चालक राहुल वैराळे असे पाच जण सुखरुप बचावले आहेत.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार