पारोळा येथे होणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या सभेसाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना महत्त्वाची सूचना ! आवश्य वाचा.

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- पारोळा येथे दिनांक 16 फेब्रुवारी गुरुवार रोजी सायंकाळी सहा वाजता एन इ एस हायस्कूलच्या पटांगणावर होणाऱ्या मुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या सभेसाठी येणाऱ्या पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांना आपल्या वाहनांच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना आपली व दुसऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी खालील दिलेल्या ठिकाणीच आपल्या वाहनांची पार्किंग करावी अशी माहिती एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार चिमणरावजी पाटील तसेच जिल्हा बँकेचे संचालक व मार्केट कमिटीचे माजी सभापती अमोल दादा पाटील, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील बाळासाहेबांची शिवसेना पारोळा तालुका प्रमुख मधुकर पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र जाधव केले आहे.

पार्किंगची व्यवस्था खालील प्रमाणे
एरंडोल,धरणगाव,अमळनेर,व धुळे रोड कडून येणारे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या वाहनांची पार्किंग- कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा येथे करावी

चोरवड रोड, कजगाव रोड, कासोदा रोड कडून येणारे पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी आपल्या वाहनांची पार्किंग- छोरीया फॉर्च्यून सिटी कजगाव भडगाव रोड पारोळा येथे करावी

तरी वरील प्रमाणे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या वाहनांची पार्किंग शिस्तबद्धतीने करून तसेच आपल्या वाहनांमुळे स्वतःला व दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आव्हान बाळासाहेबांची शिवसेना एरंडोल, पारोळा भडगाव विधानसभा मतदार संघाच्या वतीने करण्यात आली आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार