कापसाला प्रति 12 हजार रुपये क्विंटल हमीभाव मिळावा म्हणून आपतर्फे आडगाव येथे रास्ता रोको आंदोलन

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- आम आदमी पार्टी एरंडोल तर्फे भडगाव एरंडोल रस्त्यावर आडगाव या गावी कापसाला प्रत्येक क्विंटल रुपये 12000 हमीभाव मिळावा यासाठी आम आदमी पार्टी एरंडोल तालुका अध्यक्ष नामदेवराव कौतिक पाटील यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांचा कापूस घरात साठवून भाव वाढलेल्या अपेक्षावर पडलेला आहे केंद्र सरकारने कापसाला रुपये 6380 हमीभाव जाहीर केला आहे कृषी मूल्य आयोगाने आठ हजार 800 रुपये हमीभाव लागू करावा म्हणून केंद्राकडे शिफारस केली होती

परंतु त्यांची शिफारस मान्य न करता फक्त सहा हजार तीनशे रुपये हमीभाव घोषित केला त्यामुळे व्यापारी कमी भावाने कापूस खरेदी करत आहेत तसेच कापूस निर्यात न करता ऑस्ट्रेलिया सरकारशी करार करून तीन लाख गाठी आया त केल्या गेल्या व त्यावरील अकरा टक्के आयात शुल्क माप करण्यात आले हे उद्योग धारजीने धोरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने घातक आहे याचा निषेध म्हणून सदर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले

सदर आंदोलनात शिवाजी दौलत पाटील, जितेंद्र तागड, नामदेव सोनेराम पाटील, युवराज माळी, संदीप पाटील, बापू पाटील, बबलू महाजन,गोटू पाटील, गोपीचंद पाटील, निंबा पाटील, गोपाल पाटील, देवकीनंद महाजन, सुभाष मोरे, अभिमान पाटील, सतीश पवार, दादाभाऊ जावरे, शालिग्राम तागड, बापू रघुनाथ पाटील, हेमराज चव्हाण, धर्मराज महाजन, अशोक महाजन, चंद्रकांत गायकवाड ,साहेबराव पाटील, नवल पाटील, बबलू लांडे, तसेच अनेक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून निषेध नोंदवला यावेळी परिसरातील असंख्य शेतकरी उपस्थित होते

हे पण वाचा

टीम झुंजार