सध्या देशात सोशल मीडिया वर रोज नवीन नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की धावती ट्रेन पकडू नका, पण लोकांना कितीही सांगितलं तरी ते काही ऐकतं नाही. सोशल मीडियावर आपण धावती ट्रेन पडकताना झालेले अपघाताचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. तरीही लोकं लवकर पोहोचण्यासाठी जीवाची परवा न करता धावती ट्रेन पकडतात. नाशिक रोड रेल्वे स्टेशनमधला असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथून सुरू झालेल्या पवन एक्सप्रेसमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल जातो आणि तो ट्रेनखाली पडणार असतो. तितक्यात रेल्वे स्थानक परिसरात कर्तव्यावर असलेल्या रेल्वे पोलीस कर्मचाराच्या हे लक्षात येते. त्यामुळे खाली पडत असलेल्या व्यक्तीला खेचून आरपीएफ जवान त्याचा जीव वाचवतो.
KK यादव असे जीव वाचवणाऱ्या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पवन एक्सप्रेस उभी होती यावेळी १८ वर्षीय राम मोहरी प्रजापती हा तरुण प्लॅटफॉर्मवरून पवन एक्सप्रेसमध्ये चढत रेल्वे गाडीत सामान टाकत असताना ट्रेन सुरू झाली.
पहा व्हिडिओ :
यावेळी रेल्वेत चढण्याच्या घाईमध्ये त्याचा तोल गेला आणि तो रेल्वे खाली येण्याआधी येथे तैनात कर्मचारी के के यादव यांनी ही घटना पाहताच त्याला गाडीपासून दूर ओढत त्याचा जीव वाचवला.या घटनेत काही फूट अंतर हा प्रवासी फरफटत गेला होता.
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.