जिल्ह्यातील डार्क झोन उठविणे संदर्भात देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येणार.
प्रतिनिधी l एरंडोल
एरंडोल :- लक्ष्मी रमणा गोविंद श्री बालाजी महाराज की जय अशा स्थानिक श्री बालाजी महाराज यांची लोकप्रिय घोषणा देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आज केली.आ.चिमणराव पाटील यांच्या मागणीचा धागा पकडून पारोळा व एरंडोल तालुक्यांसाठी एमआयडीसी मंजूर करण्या संदर्भात निर्णय घेऊ असे आश्वासन देऊन एरंडोल मतदार संघाला फुलविण्याचे बीजे पेरली आहेत.
एन इ एस हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. पारोळा शहर व एरंडोल शहर असे दोघे मिळून 114 कोटी रुपयांच्या विकास कामांचे डिजिटल पद्धतीचे भूमिपूजन त्यांचे हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन अध्यक्षस्थानी होते. तर बंदरे व विकास मंत्री दादा भुसे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आ. चिमणराव पाटील,आ.मंगेश चव्हाण,आ. किशोर पाटील खासदार उन्मेष पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले.आ.चिमणराव पाटील व माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार केला. माजी नगराध्यक्ष नलिनी पाटील , मृणाल पाटील आदी महिलांकडून देखील सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की नानासाहेब देशमुख पोखरा योजनेत पारोळा आणि एरंडोल तालुक्याचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येईल.तसेच जळगाव जिल्ह्यातील डार्क झोन उठविणे संदर्भात देखील सकारात्मक निर्णय घेण्यात येईल अमळनेर तालुक्यातील रखडलेले पाडळसे प्रकल्पाबाबत देखील निर्णय घेऊन गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. विजेची समस्या पाहता सौरऊर्जा योजनेला प्राधान्य देण्याचे काम केले जाईल.विशेष म्हणजे कापसाच्या भाव वाढीसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून या संदर्भात विनंती करण्यात येईल असा शब्द मी या प्रसंगी शेतकऱ्यांना देतो.

अंजनी मध्यम प्रकल्प, पद्मालय प्रकल्प यांना आ.चिमणराव पाटील यांच्या मागणीवरून सुधारित प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे.रात्री बारा वाजेच्या सुमारास या प्रस्तावांना मी मान्यताही देली आहे. आमचे सरकार हे सामान्य गोरगरीब कष्टकरी यांच्यासाठी दिवस रात्र झटणारे सरकार आहे. तापी नदीवरील उंच पुलाचे व जोड रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले आहे. या कामामुळे 70 किमी अंतराचा फेरा वाचणारा आहे. मंत्री गिरीश महाजन यांना देखील पंधरा कोटी रुपये मंजूर केले आहेत. उर्वरित त्यांचे इतर प्रस्ताव देखील मंजूर केले जातील. मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.

आजही मुख्यमंत्री पदाची हवा मी डोक्यात न जाऊ देता जमिनीवर पाय ठेऊन आहे. मी कालही कार्यकर्ता होतो आजही कार्यकर्ताच आहे. मी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कुटुंबातून पुढे आलेला शेतकरी पुत्र आहे. म्हणून 18 ते 20 तास मी रोज काम करीत आहे.मी प्रत्येकाचे ऐकून घेत आहेत. काही लोकांना आरोप करण्यासाठी दोनच शब्द सापडत आहेत परंतु मी गुलाबराव पाटील यांना दीडशे खोके तर आ.चिमणराव पाटील 114 खोके विकासासाठी दिले आहेत.मी देणारा आहे घेणारा नाही.
उपस्थित भली मोठी गर्दी हे लोकांचे प्रेम व्यक्त होत आहे. असेच प्रेम सर्वदूर राज्यात मिळत आहे.हे मिळणारे प्रेम पाहून ऊर्जा व प्रेरणा मिळत आहे. हे सरकार पडणार हे सरकार कोसळणार असे आरोप विरोधक आपले आमदार टिकून ठेवण्यासाठी करीत आहेत परंतु हे बहूमताचे सरकार आहे. आणि ते विकासासाठी स्थापन झाले आहे.

लाल किल्ल्यावर शिवजयंती साजरी होणार ज्या औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्या लाल किल्ल्यात येणारी 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्यासाठी परवानगी मिळाली आहे. ही बाब आपल्या सर्वांसाठी अभिमानाची असल्याची उल्लेख मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला.

फक्त मुख्यमंत्री शिंदेंना दिसले…मंत्री गुलाबराव पाटील
75 वर्षापासून मतदार संघातील तापी नदीवरील पुलाचे काम हे कोणाला दिसले नाही.ते फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अवघ्या सहा महिन्यात दिसले व त्याचे त्यानी आज भूमिपूजन केले आहे. विकासाचे दृष्टीचे हे सरकार असून त्यासाठीच ते स्थापन झाले आहे. केंद्र व राज्याच्या माध्यमातून 38 हजार गावांना पाणीपुरवठा योजना या मंजूर केल्या आहेत. त्यातील एक ही वर्क ऑर्डर ही शिल्लक ठेवलेली नाही.

असे मनोगत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. मी मंत्री असून देखील इतका विकास निधी मला मिळाला नाही. परंतु आमदार चिमणराव पाटील यांनी तो मिळवून घेतला आहे. असे गौरवगार गुलाबराव पाटील यांनी या प्रसंगी काढले.

राज्यातील सरकार महाराष्ट्राचे चित्र बदलवीणारे गिरीश महाजन
आघाडी सरकारच्या कार्यकाळात विकास कामांना खीळ बसली होती. परंतु राज्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे सरकार बसताच महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. अडीच वर्षात जे मंत्रालयाची पायरी चढले नाहीत.ते वल्ड रेकॉर्ड करणारे आता राज्यात घरोघरी फिरत आहेत. अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता श्री गिरीश महाजन यांनी यावेळी केली. केंद्र हे राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात योजना देत आहेत. त्या योजना मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा देखील करत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने भारताला विकासाकडे नेले आहे. जगभरात आज मोदींमुळे भारताचा मान व शिर हे उंचावले आहे. काश्मीरमधील 370 कलम कधी हटवले जाणार नाही असे वाटत असताना पंतप्रधान मोदींनी ते केले आहे. अयोध्या प्रश्न हा मार्गे लावला आहे. तसेच मथुरा हे प्रश्न देखील मार्गी लागत आहेत मोदी हे जण सामान्य नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भारत हा विकासाकडे मार्ग क्रमांक करीत आहेत.

मतदार संघासाठी ऐतिहासिक दिवस
पारोळा आणि एरंडोल या शहरांसाठी 114 कोटी रुपयांचे विकास कामांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता देऊन भूमिपूजन आज केले आहे. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक दिवस मतदारसंघासाठी ठरला आहे. असे गौरव उदगार आमदार चिमणराव पाटील यांनी आज काढले आहे. इतिहासात मतदारसंघाचा इतका विकास निधी कधी मिळाला नाही. तेवढा निधी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 6 महिन्यात दिला आहे अंजनी व पद्मालय प्रकल्पांसाठी तातडीने सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन मतदारसंघाच्या विकासाला त्यांनी मोठी संजवनी दिली आहे.

तसेच पोखरा योजनेत पारोळा एरंडोल तालुक्याचा समावेश करावा अशी मागणी केली आहे. सध्या शेती संदर्भात अनेक अडचणी निर्माण झाले आहेत शेतकऱ्यांना रात्री दोन अडीच वाजता पाणी भरण्याचा साठी जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा त्रास होत आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांना संदर्भात मदतीचा हात देऊन अधिक सौर ऊर्जा योजनेला मान्यता द्यावेत अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी यावेळी केली आहे. पारोळा तालुक्यातील भामरखेडे प्रकल्पाला देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर दिली आहे

त्यामुळे या भागातील शेतकरी सुकवणार आहे. राज्य सरकार रखडलेल्या प्रकल्पांना निधी देऊन चालना देत आहेत. हे कौतुकाचे आहे. यापुढे नवीन प्रकल्पांना मान्यता देताना अगोदर जुन्या प्रकल्पांचे पूर्ण कामे मार्गी लावण्यासाठी राज्य शासनाने लक्ष द्यावे अशी विनंती वजा मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे प्रसंगी एरंडोल पारोळा मतदारसंघासाठी त्यांनी विविध प्रकल्पांची व निधीची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली. दरम्यान सभेला मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती. आजची सभा ही विक्रम मोडणारी ठरली आहे.
