सिहोर : – मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यात कुबेरेश्वर धाम येथे रुद्राक्ष महोत्सवात आलेल्या भाविकांमध्ये जळगावातील एका 3 वर्षीय मुलाचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे अचानक मृत्यू झाला. या रुद्राक्ष उत्सवादरम्यान २४ तासांत दोन महिला आणि एका ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, तर ७० जण जखमी झाले आहेत.
अमोघ विनोद भट्ट असे मृत मुलाचे नाव असून तो जळगाव शहरातील रहिवासी आहेत. पंडित प्रदीप मिश्रा यांनी आयोजित केलेल्या रुद्राक्ष महोत्सवात जळगावचे विवेक विनोद भट्ट गुरुवारी पत्नी आणि दोन मुलांसह आले होते. भट्ट यांनी सांगितले की, 3 वर्षांचा मुलगा अमोघ भट्टची प्रकृती पूर्वीपेक्षा थोडी बिघडली होती. वाहनाची सोय नसल्याने पायी आलो. वाटेत मुलाची तब्येत बिघडली. आम्ही त्याला जिल्हा रुग्णालयात नेले, जिथे त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.
गुरुवारी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी लाखोंच्या गर्दीमुळे कार्यक्रमस्थळी परिस्थिती अनियंत्रित झाली होती. शुक्रवारीही मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने रुद्राक्ष वाटपाचा कार्यक्रम थांबवण्यात आला होता. यानंतर देशभरातून रुद्राक्ष खरेदीसाठी आलेले लोक रिकाम्या हाताने परतायला लागले. पंडित मिश्रा म्हणाले की, आता सणाऐवजी वर्षभर रुद्राक्ष मिळणार आहे.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






