Viral Video: सध्याचे युग हे इंटरनेटचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. जे पाहून कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो, तर कधी दुखःही होते.सध्या अशाच एका व्हायरल व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये एक महिला आपल्या जखमी पतीला खांद्यावर घेवून जाताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओ मागची कथा ऐकून तुम्हीही भावूक व्हाल..
याबाबत अधिक माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा मध्यप्रदेशमधील आहे. यामध्ये शेतीच्या वादातून गुंडांनी एका व्यक्तीचे हातपाय तोडल्याचा प्रकार घडला आहे. यानंतर जखमी पतीला घेऊन पत्नीने थेट पोलीस अधिक्षक कार्यालय गाठले असल्याची माहिती समोर आली आहे.जखमी पतीला पाठीवर घेऊन जातानाचा पत्नीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मध्यप्रदेशमधील या ह्रदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. महिलेच्या पाठीवर बसलेल्या तरुणाच्या एका पायाला आणि हाताला प्लास्टर दिसत आहे. स्थानिक पोलिसांनी गुंडांवर किरकोळ कलम लावून गुन्हा दाखल केला असून कुणालाही अट केली नाही. तर पत्नीने त्याला SP कार्यालयात आणल्यानंतर चौकशीचे आदेश दिले आहेत.दरम्यान, हा व्हिडिओ न्यूज २४ या ट्वीटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडिओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. त्याचबरोबर सदर आरोपींवर कडक कारवाईची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

हे पण वाचा
- चोपडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांची पंढरपूर वारी सायकलीने.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- एरंडोल येथील उड्डाणपुलाजवळ रस्त्यात खड्डा पडल्याने अडकत आहेत अनेक वाहन; सदर खड्डा कोण बुजवणार मोठा प्रश्न ?
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.
- सावदा बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेस अटक.