वावडदा येथील दिनकर पाटील यांना राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार प्रदान

Spread the love

वावडदा ता.जळगाव(सुमित पाटील प्रतिनिधी)
वावडदा येथील रहिवासी,प्रयोगशील शेतकरी दिनकर दयाराम पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे दिला जाणारा सन २०२२-२३ या वर्षाचा “राज्यस्तरीय कृषिभूषण पुरस्कार” नुकताच अल्पबचत भवन जळगाव येथे 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात झाला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ महेंद्र काबरा,डॉ.केतकी पाटील,माजी सैनिक सुरेश पाटील,जळगाव दूध फेडरेशन चे संचालक आप्पासाहेब रमेश पाटील,

राजनंदनी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संदीपा वाघ मॅडम,मीनाक्षी पाटील जळगाव,युवराज पाटील,खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब सुमित पाटील आदी उपस्थित होते.सदर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिनकर पाटील यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्राप्तीबद्दल खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार