सोयगाव, दि.१९.,(साईदास पवार).. गावाच्या वेशीवर उभे राहून रविवारी शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या शिवजयंती उत्सवात गाव तंबाकू मुक्त करण्याचा संकल्प शिवजयंती दिनी जरंडी ता सोयगाव येथे करण्यात आला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांना सरपंच वंदनाबाई पाटील,उपसरपंच संजय पाटील व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अभिवादन केले
जरंडी ता सोयगाव येथे रविवारी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली गाव तंबाखु मुक्त करून गावासाठी रुग्णवाहिका घेण्याचा संकल्प शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला यावेळी ग्रामस्थांनी गावाच्या वेशीवर हा संकल्प केला त्यामुळे जरंडी गावातील या आगळ्या वेगळ्या शिवजयंती च्या उत्सवाची तालुका भर चर्चा रंगली होती

दरम्यान यावेळी शिवस्वराज्य प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी सरपंच वंदनाबाई पाटील उपसरपंच संजय पाटील ग्रामपंचायत सदस्य मधुकर पाटील दिलीप पाटील अमृत राठोड, माजी सरपंच समाधान तायडे, जिल्हा बँकेचे माजी संचालक श्रीराम चौधरी मंडळाच्या अध्यक्ष दीपक इंगळे, उपाध्यक्ष प्रतीक पाटील, शिवाजी चौधरी वैभव पाटील आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती यावेळी वैभव पाटील यांनी आभार मानले

–शिवस्वराज्य प्रतिष्ठान गावासाठी घेणार रुग्णवाहिका
गावातील रुग्णांना बाहेर गावी उपचारासाठी घेवून जाण्यासाठी आता गावासाठी मोफत रुग्णवाहिका राहणार आहे त्यासाठी शिवजयंती दिनी शिवस्वराज्य प्रतिष्ठाण च्या वतीने पुढाकार घेतला आहे
हे पण वाचा
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले