कुणबी पाटील पंच मंडळाने स्तुत्य उपक्रम राबविला — शाहीर सुरेशराव जाधव
धरणगाव प्रतिनिधी / सतिष शिंदे सर
धरणगाव — येथील समस्त कुणबी पाटील पंच मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर तथा दूरदर्शन व टीव्ही स्टार सुरेश होनाजी जाधव यांचा शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
सर्वप्रथम शाहीर सुरेशराव जाधव यांच्या हस्ते कुळवाडी भूषण – मानव प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर शाहीर व त्यांच्या सर्व टीम चे शाल, ग्रंथ आणि गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. शाहीर सुरेशराव जाधव यांनी सुरवातीला जिजाऊ, अहिल्यामाई, सवित्रीमाई, रमाई यांना पोवाड्याच्या माध्यमातून वंदन केले. शिवजन्मापूर्वीचा इतिहास, शिवजन्म एक ऐतिहासिक घटना, शिवराय व त्यांचे साथीदार, स्वराज्याची संकल्पना जिजाऊ व तुकोबाराय हेच खरे शिवरायांचे गुरू हा सर्व प्रवास कथन करतांना मी शिवबाचा सरदार या पोवाड्याच्या माध्यमातून राजेंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास कथन केला.
इतिहासातील ज्वलंतपणा, अंगावर शहारे आणणारा पहाडी आवाज, आवाजातील चढउतार, कार्यक्रमासोबत एकरूप झालेली जनता इ. विविध वैशिष्ट्ये सांगता येतील. कार्यक्रमाला राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, गावातील सुज्ञ नागरिक बंधू भगिनी, युवकांची लक्षणीय उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन समस्त कुणबी पाटील समाज अध्यक्ष व पंच मंडळ तसेच समाज बांधवांनी केले होते. कार्यक्रमाला चंद्रमौळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स धरणगाव यांचे तसेच जगदंबा टेंट हाऊस धरणगाव यांचे अनमोल सहकार्य लाभले.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.