ढासळलेल्या ,हरलेल्या मनाला अखंड ऊर्जा देणारा स्रोत म्हणजेच राजा शिवछत्रपती होय:
सतिश शिंदे सर.
धरणगाव :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्म सोहळ्याचे औचित्य साधून दि.18/2/23 वार शनिवार रोजी खर्दे, तालुका:धरणगाव, जिल्हा जळगाव या गावी व्याख्याते अँड.रवींद्र गजरे सर व सतीश शिंदे सर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे आयोजन गावातील छत्रपती शिवजयंती उत्सव समिती खर्दे व ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी केले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वक्त्यांच्या परिचय विविध कार्यकारी सोसायटीचे सेक्रेटरी श्री सुभाष पाटील यांनी केले.तर अतिथी व त्यांचा सत्कार उपसरपंच योगेश पवार व सामाजिक कार्यकर्ते राजू बाविस्कर तसेच ग्रा.स. समाधान कोळी ,अरुण पवार , रोहिदास कोळी यांनी केला.
छत्रपती शिवजयंती उत्सव सोहळ्याचे प्रथम विचारपुष्प गुंफत असताना अँड.श्री रवींद्र गजरे यांनी छत्रपती शिवराय यांनी कशा प्रकारे रयतेच्या मनावर राज्य केले हे वेगवेगळ्या उदाहरणादाखल स्पष्ट करून सांगितले.शिवाजी महाराजांनी गोरगरीब रयतेचे राज्य स्थापन केले आणि शोषितांना न्याय मिळवून दिला. त्यांचे राज्य हे 18 पगड जातींचे राज्य होय असे प्रतिपादन गजरे यांनी केले.
व्याख्यानाचे दुसरे विचार पुष्प गुंफत असताना श्री सतीश शिंदे सर यांनी शिवाजी महाराजांच्या अनेक कार्य पैलूंवर प्रकाश झोप टाकला.शिवाजी महाराज यांनी कशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य निर्माण केले ,म्हणजेच एकंदरीत शिवाजी महाराज हे ढासळलेल्या हरलेल्या मनाला अखंड ऊर्जा पुरवणारे प्रेरणा स्रोत होत असे प्रतिपादन श्री शिंदे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी तरुणांनी पुढाकार घेतला.प्रसंगी खर्दे गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- 33/11 केव्ही क्षमतेचा उपकेंद्राचे शिरसमणी येथे आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन….
- चाळीसगाव तालुक्यात वीज पडून तिघांचा मृत्यू, एकजण जखमी.
- एरंडोल चे माजी नगराध्यक्ष अपघातात गंभीर जखमी; माजी नगरसेविका पत्नी कल्पना महाजन यांनी केली घातपात असल्याची तक्रार.
- जिल्ह्यात गावठी कट्टे विकणाऱ्यां दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी केले जेरबंद; 1 लाख 70 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त.
- 60 वर्षीय व्यक्तीने विधवा महिलेवर केला बलात्कार, नराधमास धडा शिकविण्यासाठी लैंगिक अत्याचार झालेल्या अनेक महिलांनी आरोपीस जिवंत जाळले