एरंडोल येथे महाशिवरात्री उत्साहात साजरी.जय भोले ग्रुपसह विविध ठिकाणी मोफत फराळ वाटप.पहा व्हिडिओ

Spread the love

एरंडोल l प्रतिनिधी

एरंडोल- शहरात ठिकठीकाणी महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली.विविध धार्मिक संस्था,सामाजिक संस्थांच्यावतीने महादेव मंदिर परिसरात मोफत फराळ वाटप करण्यात आला.शिवरात्रीनिमित्त हजारो भाविकांनी शहरातील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.महादेव मंदिर ट्रस्टतर्फे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या हस्ते सपत्नीक महादेवाला अभिषेक करून विधी करण्यात आले.

याठिकाणी जय भोले ग्रुपच्या वतीने सात क्विंटल ५१ किलो साबुदाण्याच्या फराळाचे भक्तांना मोफत वाटप करण्यात आले.सुमारे अठरा वर्षांपासून जय भोले ग्रुपच्यावतीने दरवर्षी मोफत फराळ वाटप करण्यात येत आहे.यावेळी जय भोले ग्रुपचे अध्यक्ष प्रकाश शिरोडे, सचिव संजय चौधरी,कैलास पाटील,समाधान चौधरी, संजय साळी,आबा वंजारी,नरेंद्र शिरोडे,संतोष महाजन, वासुदेव वंजारी,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,राजेंद्र चौधरी,रवींद्र महाजन,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,,जय महाकाल ग्रुपचे प्रा.मनोज पाटील,गजानन महाजन,माजी नगरसेवक रुपेश माळी,

शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,advt.नितीन महाजन, संजय साली,मंगेश जैस्वाल,अरुण महाजन यांचेसह विविध धार्मिक क सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते.जय बाबाजी भक्त परिवारातर्फे नवीन बसस्थानकासमोर सहा क्विंटल साबुदाणा,केळी व तीनशे लिटर दुधाचे वाटप करण्यात आले.

बसस्थानकावरील हजारो प्रवासी व कर्मचा-यांनी फराळाचा लाभ घेतला.यावेळी जय बाबाजी भक्त परिवाराचे संजय पाटील,भरत महाजन,काशिनाथ महाजन,डॉ.प्रशांत पाटील यांचेसह परिवारातील सदस्य उपस्थित होते.तसेच शहरातील विविध महादेव मंदिरांच्या परिसरात भक्तांनी मोफत फराळ व उसाच्या रसाचे वाटप केले.सायंकाळी महादेव मंदिर ट्रस्टच्यावतीने शहरातून बालमित्र गणेश मंडळाच्या सहकार्याने श्री महादेवाच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.

दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करून करून मंदिरे सजविण्यात आली होती.मंदिर परिसरात आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.ठिकठीकाणी रात्री भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सर्वत्र पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टीम झुंजार