ग्रामीण भागातील विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहणार.-आ.चिमणराव पाटील. अंतुर्ली खुर्द येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन.

Spread the love

एरंडोल-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मतदार संघात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला असून,ग्रामीण भागातील विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहील असा विश्वास आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केला.अंतुर्ली खुर्द (ता.एरंडोल) येथे सुमारे दोन कोटी ७५ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील अध्यक्षस्थानी होते.

जिल्हा बँकेचे संचालक तथा पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अमोल पाटील,तालुकाप्रमुख रवींद्र जाधव माजी उपसभापती अनिल महाजन प्रमुख पाहुणे होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी मतदार संघात झालेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.मतदारसंघाची विकासाकडे वेगाने वाटचाल सुरु असल्यामुळे हतबल झालेले विरोधक खोटे आरोप करून नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.विरोधकांना विकासकामांच्या माध्यमातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्याने मतदार संघातील विकासकामांसाठी निधीची कमतरता निर्माण होणार नाही असा विश्वास व्यक्त केला.जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी विरोधकांनी केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करून पदाधिका-यांनी कार्य सुरु ठेवावे असे आवाहन केले. आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे एरंडोल व पारोळा शहराचा कायापालट झाला असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुका प्रमुख रवींद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.गावात सुमारे २ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून करण्यात येणा-या विविध विकासकामांचे आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच कांतीलाल सोनवणे,उपसरपंच गौरव पाटील,शिवसेनेचे शहरासंघटक मयूर महाजन, देशमुख राठोड यांचेसह परिसरातील ग्रामस्थ व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उत्राण येथे कार्यक्रम- उत्राण (ता.एरंडोल) येथे वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.यावेळी वीर एकलव्य मंदिराजवळील सभामंडपाचे अमोल पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले.कार्यक्रमास माजी उपसभापती अनिल महाजन,राजू पाटील,राजू पवार,शाखाप्रमुख हेमंत पाटील यांचेसह पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.

टीम झुंजार