एरंडोल येथे उद्या होणाऱ्या बारावीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेची बैठक व्यवस्था जाहीर.

Spread the love

एरंडोल-बारावीच्या मंगळवारी (ता.२१) रोजी होणा-या इंग्रजी विषयाच्या परीक्षेची बैठक जाहीर करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेची माहिती करून परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे असे आवाहन दादासाहेब पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा परीक्षेचे केंद्र प्रमुख प्रा.आर.एस.पाटील यांनी केले आहे.बारावीचा इंग्रजी विषयाची परीक्षा मंगळवारी होणार आहे.

इंग्रजी विषयाच्या पेपरासाठी रा.ति.काबरे विद्यालय, दादासाहेब पाटील महाविद्यालय (जुनी इमारत) व म्हसावद रस्त्यावरील नवीन इमारत या तीन ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक ५०६६६०९ ते ५०६६८३५ तर कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक ५१२६३३७ ते ५१२६७१२ या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच दादासाहेब पाटील महाविद्यालयाच्या म्हसावद रस्त्यावरील नवीन इमारतीत वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था क्रमांक ५१५५६८० ते ५१५५८८३,कला शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक ५१२६७१३ ते ५१२६७१२ तर किमान कौशल्य विभागातील विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक ५१६१३४५ ते ५१६१४१९ या क्रमांकांच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी बैठक क्रमांक ५०६६८३६ ते ५०६७२८१ क्रमांकाच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेची माहिती घेवून परीक्षा केंद्रात परीक्षेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.आर.एस.पाटील यांनी केले आहे.परीक्षेसाठी येतांना विद्यार्थ्यांनी हॉल तीकीत्व परीक्षा साहित्य बरोबर आणावे तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार