निंभोरा जि प कन्या शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील स्टेशन रोड जवळील जि प कन्या शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांची 393 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार काशिनाथ शेलोडे यांनी छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून प्रतिमेचे पूजन केले यावेळी विद्यार्थिनी वैदेही कोंडे हिने राजमाता जिजाऊ चा वेश परिधान केला होता.

तसेच विद्यार्थिनींनी छत्रपती राजे यांच्या जीवन व कार्यांच्या आधारावर भाषणे वाचून दाखवली या कार्यक्रमाला माजी ग्रामपंचायत सदस्य सिंधुताई शेलोडे शिक्षक वृंद मुख्याध्यापक तुषार वाणी हेमंत चौधरी जयश्री भारंबे वैशाली कोलते विद्यार्थिनी शालेय पोषण आहार सेविका यांची उपस्थिती होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार