निंभोरा येथे शिवाजी महाराजांच्या तरुण मावळ्यांनी रक्तदानाने शिवजयंती साजरी केली

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी

रावेर :- तालुक्यातील निंभोरा येथील युवा मित्र मंडळ या तरुणाईने रक्तदानाने शिवजयंती साजरी केली या कार्यक्रमाचे आयोजन निंभोरा येथील परमानंद शेलोडे व योगेश सोनवणे युवा मित्र मंडळ रेड प्लस ब्लड बँक जळगाव यांच्या सौजन्याने सालाबाद प्रमाणे रेणुका माता मंदिरात करण्यात आले या कार्यक्रमाला पाच वर्ष पूर्ण झाले याप्रसंगी एकूण 75 रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांमध्ये निंभोरा पोलीस ठाण्याचे एपीआय गणेश धुमाळ यावल येथील सेंट्रल बँक कॅशियर आनंद सर कवडीवाले निंभोरा येथील डॉक्टर एसडी चौधरी यांचा समावेश होता यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाला आलेल्या मान्यवरांसोबत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला .

या कार्यक्रमाला गावातील मान्यवर प्रल्हाद भाऊ बोंडे कडू धोंडू चौधरी डी वाय एस पी कृणाल सोनवणे सरपंच सचिन महाले बाजार समिती माजी उपसभापती दुर्गादास पाटील सचिन चौधरी प्रशांत पाटील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सुनील कोंडे पंचायत समिती माजी सदस्य प्रमोद कोंडे पत्रकार राजू बोरसे भास्कर महाले गोकुळ भोई सर विवेक बोंडे सर काशिनाथ शेलोडे नरेंद्र ढाके मोहन भंगाळे सुरेश भंगाळे अमोल खाचणे सतीश नाना पाटील नितीन पाटील युनूस खा शफी खा मनोहर तायडे मनोज सोनार राहुल सोनार धनराज राणे तसेच गावातील सेवाभावी डॉक्टर झोपे डॉक्टर वाणी डॉक्टर भालेराव डॉक्टर पाटील यांची उपस्थिती होती .

कार्यक्रम यशस्वी करण्याकरता युवा मित्र हिमांशू चौधरी अक्षय दोडके आदित्य इखणकर निलेश बराटे चेतन महाले मोहित भालसाकळे यांनी परिश्रम घेतले रक्तदातांचे व उपस्थिताचे आभार योगेश सोनवणे यांनी मानले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार