Foods To Maintain Healthy Blood : रक्त शुद्ध होण्यासाठी उत्तम आहार गरजेचाच…
रक्त हा आपल्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा घटक असतो. आपल्या शरीरात रक्ताची निर्मिती होते, या रक्ताद्वारेच आपल्या संपूर्ण शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होत असतो. म्हणूनच आपला आहार पोषक असावा असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. मात्र आपण जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आहारात अनावश्यक गोष्टी खातो. पण संपूर्ण शरीराला शुद्ध रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी आपलं रक्त अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतं.
हेच रक्त अधिकाधिक शुद्ध आणि स्वच्छ असावं यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. लोह, व्हिटॅमिन सी आणि इतर आवश्यक पोषक तत्वांनी युक्त आहार घेतल्यास लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढण्यास आणि संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत होते. तुमच्या शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला सक्षम ठेवण्यासाठी हे लोहयुक्त पदार्थ आणि औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करायला हवा. हे पदार्थ कोणते ते पाहूया…

१. गव्हांकुराचा रस, काकवी, राजमा आणि टोफू या पदार्थांमुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत होते. आपण हे पदार्थ आहारात घेतोच असे नाही. मात्र उत्तम आरोग्यासाठी हे पदार्थ फायदेशीर ठरतात.
२. पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये रक्त शुद्ध आणि स्वच्छ करणारे आरोग्याला आवश्यक असणारे घटक असतात. तसेच पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असणारे इतरही घटक असतात, म्हणून आहारात आवर्जून पालेभाज्यांचा समावेश करायला हवा.
३. संत्र्याचा ज्यूस, खजूर, मध, काळे मनुके यांच्यात लोह आणि प्रोटीन पुरेशा प्रमाणात असते. त्यामुळे रक्त चांगले राहण्यास या घटकांची चांगली मदत होते. म्हणून आहारात हे घटक अवश्य घ्यायला हवेत.
४. आवळा, मंजिष्ठा, गुडुची यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांमुळे रक्तशुद्धी होते. तसेच रक्तप्रवाह सुरळीत होण्यासही हे पदार्थ उपयुक्त ठरतात. त्यामुळे या पदार्थांचाही आहारात आवर्जून समावेश करायला हवा.
हे वाचलंत का ?
- Viral Video: ‘पापा की परी’ रीलच्या नादात धबधब्या जवळ जातांना अचानक……जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका पहा व्हिडिओ.
- महिन्याभरापूर्वीच विवाह झालेल्या नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये गॅस गिझरच्या गळतीमुळे दुर्दैवी अंत…..
- भुसावळ येथील गोडाऊन मधून 35 लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तु चोरीच्या गुन्हा उघडकीस; शिरपूर येथून मुद्देमालासह दोघांना घेतले ताब्यात.
- भूसंपादनाचा वाढीव मोबदला न दिल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयातील साहित्याची पारोळ्याच्या शेतकऱ्यांनी केली जप्ती.
- ऑनलाईन जुगारामुळे कर्जबाजारी झालेल्या विवाहित तरुणाने दोन वर्षांच्या मुलासह पत्नीला विष दिलं, मग स्वतःनेही संपविले जीवन.