धरणगाव – धरणगाव आज दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. या संपात सहभागी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, धरणगाव, येथील सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी महाविद्यालयाच्या गेट समोर काम बंद आंदोलन करून एक दिवसीय लाक्षणिक संपात सामील झाले होते. शासनाच्या उदासीन धोरणाचा विरोधात पुढील प्रलंबित मागण्या १) जुनी पेन्शन योजना लागू करावी २) सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पुन्हा सुरू करावी व रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करावा ३) दहा वीस तीस लाभाची योजना विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करावी ४) 58 महिन्यांची सातव्या वेतन ची थकबाकी त्वरित मिळावी ५) विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावर मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत ती सर्व पदे त्वरित भरावी अशा अनेक मागण्यांसाठी वारंवार शासनाची चर्चा करून सुद्धा शासनाने दखल घेतली नाही व खोटे आश्वासन देत वेळ काढूपणाचे धोरण राबविले म्हणून शासन दरबारी आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र शिक्षकेतर महासंघाने पाऊल उचलेल आहे.
हा एक दिवसाच्या लाक्षणिक संप आज करण्यात आला आणि आमच्या मागण्या मान्य झाल्यास येणाऱ्या 20 फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्धार महासंघाने घेतलेला आहे. या संपात धरणगाव महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र परदेशी बायास तसेच उपाध्यक्ष संजय नेटके व सचिव परेश पाटील यांनी आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे.या संपाला धरणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के. एम. पाटील सर तसेच सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांनी पाठिंबा दिलेला आहे.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






