छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त धरणगाव येथे बी आर्किटेक्ट क्लासेसच्या वतीने व्याख्यान व विविध कार्यक्रम संपन्न

Spread the love

छत्रपती शिवरायांचे आदर्श जीवन जनसामान्यांना आजही प्रेरणादायी ..! युवा वक्ते सतिष शिंदे.

धरणगाव प्रतिनिधी

धरणगाव :- येथील बी आर-टेक क्लासेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी युवा वक्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत ऐतिहासिक वारसा व वर्तमान यांची सांगड घालत श्रोत्यांना व्याख्यानाच्या माध्यमातून माहिती देत महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आपण आहोत , आपल्या जीवनात आपण त्यांचे विचार अंगीकार केले पाहिजे असे प्रतिपादन केले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प रा सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर अरुण कुलकर्णी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते सुनील चौधरी, डॉक्टर संजीव कुमार सोनवणे, जेष्ठ पत्रकार बी आर महाजन,व्याख्याते सतीश शिंदे, अँड स्वाती निकम, वैशाली पवार, समाधान पाटील, भारती चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचा स्वागत व सत्कार बुके व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला. प्रास्ताविक म्हणून क्लासचे संचालक जितेंद्र चखाले यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिव महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित राज्याभिषेक देखावा, नाटिका, विविध हिंदी-मराठी गाणी, पोवाडे यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलीत.

यावेळी मनोगत म्हणून अँड स्वाती निकम, डॉक्टर संजय कुमार सोनवणे, बी आर महाजन, सुनील चौधरी, समाधान पाटील यांनी मनोगत व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपटावर मार्गदर्शन केले.यावेळी व्याख्याते सतीश शिंदे यांनी वीर रसामध्ये शिवाजी महाराजांवर प्रबोधन केले.ऐतिहासिक व्याख्यान देत असताना श्रोत्यांना त्यांच्या अनोख्या शैलीत छत्रपती शिवराय व मा साहेब जिजाऊ यांचे आदर्श जीवन विवेचन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजया सोनवणे यांनी केले तर आभार नेहा गुप्ता यांनी मानले.

हे वाचलंत का ?

  
टीम झुंजार