तासखेडा येथे अवैध माती उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यास महसूल प्रशासनाची डोळेझाक. चर्चेला आला ऊत.

Spread the love

निंभोरा प्रतिनिधी

रावेर :- तालुक्यातील तासखेडा येथे लघुपाटबंधारे विभागाचा कालवा जात असून विटभट्टी जवळ मोठ्या प्रमाणात जेसीबी मशिंनच्या साह्याने अवैध माती उत्खनन करण्यात आले आहे.तसेच लघुपाटबंधारे/महसूल विभागामार्फत कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना अगदी खुलेआम मातीची उत्खनन व वाहतूक केली जात आहे.मात्र,या गंभीर प्रकाराकडे पाटबंधारे विभागासह महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अवैध माती उत्खनन सुरू आहे.त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.तसेच शासनाचा महसूल बुडविण्यास जबाबदार असणाऱ्यांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनमानसातून होत आहे.


तसेच या गंभीर प्रकाराकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे तसेच जेसीबी मालक शुभम विकास चौधरी यांच्यावर अवैध माती उत्खनन केले बाबत कारवाई करणेसाठी तहसीलदार सो.रावेर यांना देखील २४-१-२३ रोजी पत्रकार संरक्षण समितीतर्फे लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच आज पावेतो महसूल विभागामार्फत संबंधितावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण तर झाली नाही ना?तसेच राजकीय दबाव येत नाही ना?या चर्चेला नागरिकांमध्ये आले उधाण संबंधितावर महसूल विभाग कारवाई करणार केव्हा याकडे तासखेडा परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार