सोयगाव, दि.२१.(साईदास पवार).१४ खेड्यांना लागून असलेल्या सोयगाव च्या आठवडे बाजारात मंगळवारी( दि.२१) भाजीपाला दरात चढ-उतार आढळून आला दरम्यान मेथीच्या दरात चढ-उतार कायम असून वांगी,सिमला, गवार चे दर तेजीत होते कोथिंबीरचे दर आवाक्यात असून कोथिंबीर ची पेंढी पाच रु ला एक असे होते सोयगाव आठवडे बाजारात फळ मार्केट मध्ये द्राक्षे व टरबूजची आवक झाली आहे द्राक्षाच्या आवक वाढल्याने दर आवाक्यात आले आहे.
स्थानिक भाजीपाल्याची आवक वाढली आहे त्यामुळे कोबी,फ्लॉवर, ओली मिरची,भेंडी,दोडक्याच्या दर स्थिर आहेत या आठवड्यात वांग्याची आवक कमी झाली आहे त्यामुळे दरात वाढ झाली असून, गवारचे दर चढेच राहिले आहे गेल्या आठवड्यात घाऊक बाजारात ६० रु प्रति किलो असणारी गवार ७५ रु पर्यंत पोहचली आहे उष्णता वाढू लागल्याने काकडीचे दर ही वाढू लागले आहे

सध्या बाजारात तीस रु किलो दर असला तरी किरकोळ विक्री साठी चाळीस रु मोजावे लागतात पाले भाज्यांचे आवक वाढली असून दरात घसरण झाली आहे किरकोळ बाजारात मेथी,पालक,पाच रु पेंढी चा दर आहे शेंगेचा दर कमी झाला असून दहा रुपयांनी शेंगा चा दर आहे फळ मार्केट मध्ये द्राक्षे, सफरचंद, डाळिंब,टरबूज, खरपूस कलिंगड आदी फळांची आवक वाढली आहे…..त्यामुळे दर चाळीस ते पन्नास रु किलो आहे…
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






