चोपडा : – सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वराड गावाच्या शेत शिवारातून एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. टरबूज भरून चोपडाकडे येत असलेल्या ट्रकचं चाक शेतातील मातीवरून स्लीप झाल्याने एका बाजूला उलटल्याची घटना सोमवारी घडली. यात ट्रकखाली दबला गेल्याने एका ट्रक क्लिनरचा मृत्यू झाला आहे. साजीद मोहम्मद बागवान (३५, साने गुरुजीनगर, चोपडा) असं क्लिनरचं नाव आहे. या अपघातात सहा मजूर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साजिद महमद बागवान हा अमजद खान तमीझ खान पठान यांच्या ट्रकवर (एमएच १८ बीए ३४८६) क्लिनर म्हणून काम करत होता. सोमवारी साजीद बागवान हा वराड शिवारात टरबूज भरण्यासाठी ट्रकचालकासोबत गेला होता. गाडी टरबूजने भरून चोपडाकडे येत असताना ट्रक मातीच्या रस्त्यावरून स्लिप होऊन उलटला. या अपघातात क्लिनर साजीद बागवान हा ट्रकच्या केबीनखाली दबला गेल्याने जागीच ठार झाला. तर या अपघातात ट्रकमध्ये बसलेले सहा मजूर जखमी झाले.
यामध्ये किरण मोरे (१७), लताबाई सोनवणे (३४), प्रवीण भिल्ल (२०), गणेश भिल्ल (१६), लताबाई भिल्ल (४०, रामपुरा, चोपडा), शफी फारूक बागवान (३४, केजीएन कॉलनी, चोपडा) या मजुरांचा समावेश आहे. जखमींवर चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ट्रकला बाजूला करुन केबिनच्या खाली दबलेल्या साजीद बागवान याला बाहेर काढलं. मात्र त्याचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळाल्यावर जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिका, कर्मचारी, चोपडा नागलवाडी, वराड येथील अनेकजण घटनास्थळी पोहोचले. या घटनेत ट्रकमधील टरबजूचंही मोठया प्रमाणात नुकसान झालं आहे.
या अपघातात ट्रक क्लिनरचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. शेतातून टरबूजांनी भरलेला ट्रक घेऊन निघालेल्या मजुरासोबत दु:खद घटना घडली. यात शेतातील शेतमाल, टरबूजांचं मोठं नुकसान झालं आहे. अख्खा ट्रक पलटी झाल्याने सर्व टरबूज रस्त्यावर पसरले असून शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल बसस्थानकावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य; आगार व्यवस्थापकांचे बस स्थानकाच्या स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष.
- पाऊले चालती पंढरीची वाट-चांदसर पायीदिंडीचे एरंडोलला स्वागत स्व. जयवीरबापू पाटील स्मृतीप्रित्यर्थ -गटसचिव संघटना 18 वर्षांपासून करीत आहे अन्नदान.
- “पैसेही गेले आणि बायकोही गेली पुन्हा मी एकटाच”… तीन लाख देऊन आणलेली बायको निघाली एका मुलीची आई; दोन दिवसांत टोळीचा भांडाफोड.
- मेट्रो स्टेशनखाली वडिलांजवळ झोपलेल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर .VIDEO
- तरुणाचे एकीशी प्रेमसंबंध, तिचं दुसऱ्याशी लग्न ठरलं, तरुण गेला जाब विचारण्यास , तेथे झाला वाद पळून घरी येताना तरूणाचा खून करून तो अपघात असल्याचा केला बनाव.