एरंडोल परीक्षा केंद्रावर बैठकी पथकासह सहा भरारी पथकांची भेट, परीक्षा केंद्रात पेपर सुरळीत सुरू,बाहेर कॉफी पुरविणाऱ्याची धुमाकूळ.

Spread the love

एरंडोल:- येथे डीडीएसपी महाविद्यालयात बारावी परीक्षेचे केंद्र असून २१ फेब्रुवारी रोजी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर होता यावेळी पेपर सुरू झाल्यापासून संपे पर्यंत बैठे पथक ठाणं मांडून बसले याशिवाय विविध स्तरावरील सहा पथकांनी परीक्षा केंद्राला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. विशेष आहे की तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी पोलिसांची काठी हातात घेऊन परीक्षा केंद्राबाहेरच्या गर्दीला पांगवले . त्यांचे हे शिस्तप्रिय रूप पाहून कॉपी पुरवठा करणाऱ्या युवकांनी काढता पाय घेतला. त्यामुळे इंग्रजीचा पेपर सुरळीत पार पडला.

पोलीस प्रशासनातर्फे प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे उपनिरीक्षक शरद बागल, अनिल पाटील मिलिंद कुमावत सुनील लोहार स्वतः परीक्षा केंद्राबाहेर फिरताना दिसत होते. परीक्षा केंद्रात विद्यार्थी पेपर शांतपणे लिहीत होते मात्र बाहेरून कॉपी पुरवणारे बहाद्दर त्या विद्यार्थ्यांना विचलित करीत असल्याचे दिसून आले.

बाहेरून कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांना लगाम लावण्यात आला पाहिजे व परीक्षा केंद्रा जवळची असलेली झेरॉक्सची दुकान गुपचूप पणे सुरू होती.अशी झेरॉक्स ची दुकाने सुद्धा बंद करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान परीक्षा केंद्राच्या बाहेरून दोन मजल्याच्या बिल्डिंगवर चढवून विद्यार्थ्यांना डिस्टर्ब करून कॉफी पुरतांना दिसून आले हे बहाद्दर दुसऱ्या मजल्याच्या बिल्डिंग वरून खाली पडल्यास मोठी अनर्थ घटना घडण्याची शक्यता आहे.

एरंडोल परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपरला १३०७ विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला केंद्रप्रमुख संचालक म्हणून प्राध्यापक आर एस पाटील हे कामकाज पाहत आहेत त्यांना प्रा. व्ही.एस वाघ, प्रा. जे.व्ही.पाटील प्रा.नितीन पाटील, शेखर पाटील, एन बी गायकवाड,एस ए.पाटील यांनी कामकाज पाहिले.

हे पण वाचा

टीम झुंजार