नांदगाव शिवारात भरदिवसा विजपम्प चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

सोयगाव, दि.२२.(साईदास पवार)..नांदगाव ता सोयगाव शिवारातील शेती पिकांना पाणी भरणा करत असतांनाच अज्ञात चोरट्यांनी विजपम्प काढून भरदिवसा विजपम्प चोरी केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली याप्रकरणी बुधवारी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून सोयगाव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सोयगाव सह परिसरात शेतकऱ्यांच्या वीजपंपाच्या चोऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे

मंगळवारी दुपारी चक्क पिकांना भरणा करत असताना नांदगाव शिवारातील धरणातील शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या वीज पंपावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून भरदिवसा धरणातील विजपम्प चोरून नेला आहे शेतकरी समाधान शंकर परदेशी यांनी सोयगाव पोलिसात बुधवारी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्या विरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे रवींद्र तायडे अजय कोळी गणेश रोकडे आदी पुढील तपास करत आहे…

हे पण वाचा

टीम झुंजार