सोयगाव, दि.२२.(साईदास पवार).सध्या पहाटे गारठा असला तरी दुपारी सोयगाव तालुक्यात उन्हाचे चटके बसत आहे त्यामुळे उकाडा वाढल्याने शीतपेये,लिंबूपाणी पिण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे त्यामुळे सोयगाव तालुक्यात अचानक लिंबाची मागणी वाढली परंतु आवक कमी झाल्याने दर वाढले आहे सध्या पाच रुपयांचा एकच लिंबू मिळत असून आणखी दर वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
सध्या घाऊक बाजारात लिंबू दोनशे ते तीनशे रु शेकडा दराने मिळत आहे त्यामुळे किरकोळ विक्रीत दरवाढ झाली असून सध्या रात्री आणि पहाटे थंडीचा जोर कायम असला तरी दुपारी ऊन असह्य होत असल्याची स्थिती सीयगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे हवामान खात्याने पुढील दोन दिवसात तापमान ,४० अंश सेल्सिअस च्या वर जाणार असल्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे थंड पेयाकडे कल वाढला आहे परिणामी लिंबाच्या दरात वाढ झाली असून साठ ते नव्वद रु दराने विकली जाणारे लिंबू दोनशे ते तिनशे रु प्रती शेकड्यावर पोहचले आहेत

—आगामी काळातही दर चढेच
सोयगाव तालुक्यात खान्देश व मध्य प्रदेशातुन मोठ्या प्रमाणावर लिंबू येतात विक्रीसाठी या लिंबूच्या भावात वाढ झालेली आहे शाकाहारी जेवण आणि लिंबूपाणी यासाठी बदलत्या वातावरण यामुळे लिंबाच्या मागणीत वाढ झाली आहे उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबू सरबतची मागणी वाढून लिंबांना अधिक भाव आला आहे वातावरणातील बदलामुळे फेब्रुवारी महिन्यातच ही स्थिती आहे एप्रिल-मे महिन्यापर्यंत लिंबाच्या दर कडाडण्याची शक्यता आहे त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत लिंबाचे दर असे च चढे राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






