हिंगोली : पत्नीच्या अनैतिक वर्तनास कंटाळून पतीने गावाकडे येऊन बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकरा विरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपली पत्नी शेजाऱ्यासोबत संबंध प्रस्थापित करत असल्याची माहिती पतीला मिळाली. कुटुंबीय, नातेवाईकांनी समजावल्यानंतरही तिच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. अखेर पतीनेच पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समज दिली, तर त्यांनीच पतीला आमच्यामध्ये पडू नको म्हणत जिवे मारण्याची धमकी दिली. या धमकीला कंटाळून पतीने आत्महत्या केली.
मयत अशोक दत्तराव भिसे (३५, रा. जरोडा, ता. कळमनुरी) याचे लग्न गावाशेजारील येलकी गावातील दुर्गा नावाच्या मुलीसोबत २००७ मध्ये झाले. त्यानंतर दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्य झाली. कामानिमित्ताने ते औरंगाबाद येथे बजाजनगर येथे भाड्याने राहत व कंपनीत काम करत होते. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत पत्नीचे संबंध प्रस्थापित झाले. त्यानंतर पतीसोबत तिचे बिनसत गेले. पतीने सदरील बाब आई, भाऊ, सासू-सासरे यांच्या कानावर घातली.

सर्वांनी तिची समजूत काढली व नीट राहण्याबाबत समज दिली. परंतु, तिच्या वर्तनात काही सुधारणा झाली नाही.अखेर पतीने पत्नी व तिच्या प्रियकराला नीट राहण्याबाबत समजावले. परंतु, त्या दोघांनी पतीलाच धमकी दिली. तू आमच्यामध्ये पडू नकोस, असा सज्जड दम देत जिवे मारण्याची धमकी दिली. एके दिवशी प्रियकरासोबत ती मुले पतीजवळ सोडून निघून गेली. त्यानंतर तो आपले मूळ गाव जरोडा येथे परतला व नातेवाईकांना सांगून माझ्या जीवनात काही अर्थ नाही, असे म्हणाला.

जरोडा गावातील आबादानी जवळील एका बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.याप्रकरणी प्रभाकर दत्तराव भिसे यांच्या तक्रारीवरून पत्नी दुर्गा अशोक भिसे व तिचा प्रियकर शंकर (रा. हल्ली मुक्काम औरंगाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रियकराचे नाव विचारले असता मयताच्या घरच्यांना प्रियकराचे पूर्ण नाव माहिती नाही, असे सांगितले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






