जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
शुभ रंग:मोतिया, शुभ अंक : १
आजचा दिवस तुमच्यासाठी पूर्ण अनुकूल आहे. सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. विवाहेच्छुकांना आज मनपसंत स्थळांचे प्रस्ताव येतील. विरोधक नमते घेतील.
वृषभ :-
शुभ रंग:हिरवा, शुभ अंक : ६
कौटुंबिक गरजा भागवताना थोडीफार तारेवरची कसरत होईल, पण तुम्ही निभावून न्याल. काही जणांना अनपेक्षितपणे दूरचे प्रवास घडणार आहेत.
मिथुन :-
शुभ रंग:गुलाबी, शुभ अंक : ४
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होणार आहे. सकारात्मक राहून आजचा दिवस सत्कारणी लावा. म्हणाल ती पूर्व.
कर्क :-
शुभ रंग: मरून, शुभ अंक : ५
उच्च अधिकारी वर्गास अधिकार वापरण्याची वेळ येईल. नोकरीत बढतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आज कर्तव्यासच प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यग्र दिवस.
सिंह :-
शुभ रंग: निळा, शुभ अंक : २
आज सज्जनांच्या सहवासात वैचारिक देवाण-घेवाण होईल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. कार्यक्षेत्रात काही किरकोळ अडचणींचा सामना करावा लागेल.
कन्या :-
शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ३
कार्यक्षेत्रात कोणतीही धाडसाची कामे टाळाच. आर्थिक व्यवहार मर्यादेबाहेर नकोत. गोडबोल्या मंडळींपासून दूरच राहा. झटपट लाभाचा मोह टाळा. संयम ठेवा.
तूळ :-
शुभ रंग:भगवा, शुभ अंक : २
कौटुंबिक जीवनात सुसंवाद असल्याने तुम्ही आज घराबाहेरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. अडचणीच्या प्रसंगी आज पत्नीची खंबीर साथ राहील.
वृश्चिक :-
शुभ रंग:आकाशी, शुभ अंक : १
क्षुल्लक वाटणाऱ्या कामातही ऐनवेळी काही अडचणी येतील. ध्येयप्राप्तीसाठी चालू असलेल्या तुमच्या अथक प्रयत्नांना आज दैवाचे पाठबळ नक्की मिळेल.
धनू :-
शुभ रंग:जांभळा, शुभ अंक : ६
कलाक्षेत्रातील मंडळींना रसिक मनसोक्त दाद देतील. तरुण मंडळींच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. आज स्वत:चे छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसाही खर्च करू शकाल.
मकर :-
शुभ रंग:केशरी, शुभ अंक : ८
आज गृहिणी घर स्वच्छतेचे मनावर घेतील. काही जण सहकुटुंब प्रवासास निघतील. आज प्रवासात नवे हितसंबंध जुळतील. वाणीत मात्र गोडवा असू द्या.
कुंभ :-
शुभ रंग:लाल, शुभ अंक : ४
आज तुमची आर्थिक बाजू भक्कम राहील. एखाद्या महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात होईल. आज आपल्या जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.
मीन :-
शुभ रंग:पांढरा, शुभ अंक : ५
आर्थिक आवक मनाजोगती राहील. आज काही प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. वाणीत मृदुता ठेवलीत तर अनेक अवघड कामे सोपी होतील. प्रवासात त्रास होईल.
हेही वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






