धरणगाव प्रतिनिधी – सतिष शिंदे सर
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वच्छतेचे महामेरू राष्ट्रसंत गाडगेबाबा जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले व इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख एस एन कोळी यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. एस एन कोळी यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना सांगितला. निरोप समारंभ प्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सहा वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. वर्ग दहावीचे वर्ग शिक्षक एस व्ही आढावे व पी डी पाटील यांनी निरोपार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत संदर्भात सूचना दिल्या. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो. आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे बळ देण्याचे काम करीत असतो आणि हेच बळ घेऊन आमच्या विद्यार्थ्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीमध्ये उंच शिखर गाठावे या सदिच्छा देऊन बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
विज्ञान शिक्षिका पी आर सोनवणे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष जे एस पवार यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊन आपल्या शाळेचे नाव मोठे करा आपल्या शाळेची दरवाजे तुम्हाला सदैव उघडी आहेत आम्ही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सदैव तत्पर आहोत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना शाळेकडून अल्पोहार देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






