एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल :- तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना मधील मंजूर घरकुले ज्यांना प्रथम हप्ता देऊन शंभर दिवसाच्या कालावधी उलटला आहे. असे लाभार्थी ज्याना वारंवार पंचायत समिती एरंडोल तसेच ग्रामपंचायत मार्फत तोडी सूचना तसेच लेखी नोटीस देऊन सुद्धा बांधकाम अद्याप देखील सुरू केले नाही असे तालुक्यातील 477 प्रलंबित घरकुले ज्यांच्यावर गुन्हे दाखल करणे बाबत मु.का.अ. जि प जळगाव यांनी आदेशित केलेले असून लवकर अशा लाभार्थींवर गट विकास अधिकारी एरंडोल पंचायत समिती गुन्हे दाखल करणार आहेत.
याबाबत माहिती अशी की आवास योजनेअंतर्गत सन 2016- 17 ते आज पर्यंत मंजूर प्रलंबित असलेली घरकुले पूर्ण करण्यासंदर्भात सूचित करण्यात आलेले आहे तालुक्यातील 477 घरकुलांना पहिला हप्ता वितरीत केलेला आहे परंतु सदर लाभार्थी घरकुलाचे बांधकाम करण्यास इच्छुक नाहीत किंवा त्यांनी सुरुवात न केल्याने अशा लाभार्थींकडून अदा करण्यात आलेले अनुदान रक्कम वसुली करून त्यांना रद्द करण्याचे आदेश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. जे लाभार्थी अनुदान रक्कम परत करण्यास नकार देत आहेत अशा लाभार्थी यांचे ग्रामपंचायत दप्तरी असलेल्या स्वयम मालकीच्या कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेवर किंवा महसूल दप्तरी असलेल्या शेती सातबारा उताऱ्यावर किंवा लाभार्थी याच्या स्थावर जंगम मालमत्तेवर बोजा बसवण्याच्या आदेश शासनाकडून प्राप्त झालेला आहे.

घरकुलांचे बांधकाम सुरू न केल्याने लाभार्थी यांनी शासनाचे मंजूर केलेल्या अनुदनाच्या गैरवापर केलेला असून सदर रक्कम शासनात परत करणे बाबत त्यांना वेळोवेळी ग्रामपंचायत मार्फत तसेच पंचायत समिती एरंडोल यांच्या कार्यालय मार्फत लेखी व तोंडी सूचना देऊ ही घरकुलांचे बांधकाम सुरू केलेले नाही व अनुदान देखील परत केलेले नाही अशा लाभार्थींवर एरंडोल पोलीस स्थानकात व कासोदा पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे
दरम्यान तालुक्यातील गाव निहाय संपर्क अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, शाखा अभियंता यांची नेमणूक करण्यात आली आहे.

कोट
ज्या लाभार्थ्यांनी अद्याप पावतो घरकुल बांधकामास सुरुवात केलेली नाही. अशा लाभार्थ्यांवर येत्या पंधरा दिवसात कार्यवाही करण्यात येईल तसेच अशा लाभार्थ्यांना भविष्यात घरकुलांचा लाभ मिळण्यास आपात्र राहतील. लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून देण्यात आलेली रक्कम पूर्णपणे वसूल करण्यात येणार आहे
दादाजी जाधव- गट विकास अधिकारी पंचायत समिती एरंडोल
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






