16 हजारांची लाच घेताना पंटरासह हवालदार ए.सी.बी. जाळ्यात, पटंरास रंगेहाथ पकडले.

Spread the love

बोदवड | 16 हजारांची लाच स्वीकारणार्‍या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केलीय. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडालीय. वसंत नामदेव निकम असे पोलीस हवालदारचे नाव असून एकनाथ कृष्णा बाविस्कर असे पंटरचे नाव आहे.

नेमका काय आहे प्रकार?
बोदवड पोलीस स्थानकात एका व्यक्ती व त्याचे तीन सामाजिक कार्यकर्ते विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मदत करण्याच्या नावाखाली हवालदार वसंत नामदेव निकम यांनी त्या व्यक्तीकडे २० हजार रूपयांची लाच मागितली होती. तडजोड करून हा आकडा १६ हजार रूपयांवर निश्‍चीत झाला.

दरम्यान, संबंधीत व्यक्तीने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार आज सापळा रचण्यात आला. यानुसार पथकाने तहसील कार्यालयाच्या आवारात हवालदार वसंत नामदेव निकम आणि त्यांचा पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर यांना रंगेहात अटक करण्यात आली. या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक संजोग बच्छाव आणि त्यांचे सहकारी स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ .सचिन चाटे, पो.कॉ.प्रणेश ठाकुर.यांनी कारवाई केली. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा


टीम झुंजार