Health Tips : कागदाच्या कपात चहा पित असाल तर वेळीच सावध व्हा. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
Health Tips : चहाचं सेवन करणं जास्तीत जास्त लोकांना आवडतं. त्यामुळे चौकाचौकात चहाची दुकाने दिसतात. अनेकदा तर कपचं डिझाइन बघूनही चहा पिण्याचं मन होतं. पण तुम्ही जर कागदाच्या कपात चहा पित असाल तर वेळीच सावध व्हा. असं केलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. याने तुमचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. असा दावा एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.
कागदाचा कप नुकसानकारक
नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून तीन वेळा चहा पित असेल तर त्यांच्या शरीरात प्लास्टिकचे ७५ हजार सूक्ष्म कण जातात. आता यावरून तुम्ही अंदाज लावा की, कागदाच्या कपाचा एकदा वापर करणंच किती नुकसानकारक ठरू शकतं.
हायड्रोफोबिक फिल्मचा होतो वापर
कागदाच्या कपात चहा पिण्याबाबत आयआयटी खडगपूरमध्ये रिसर्च करण्यात आलाय. ज्यात आरोग्यावर पडणाऱ्या प्रभावाबाबत सांगण्यात आलं आहे. या रिसर्चचं नेतृत्व करणारे आयआयटी खडगपूरमधील सहाय्यक प्राध्यापिका सुधा गोयल यांनी सांगितले की, कागदाचे डिस्पोजल कपांमध्ये पेय पदार्थ पिणं सामान्य बाब झाली आहे. पण आरोग्यावर याचा विषासारखा परिणाम होतो.
काय सांगतो रिसर्च?
या रिसर्चनुसार, ‘आमच्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, या कपांमध्ये प्लास्टिक आणि इतर घातक तत्वांमुळे गरम तरल पदार्थ दुषित होतो. हे कप तयार करण्यासाठी सामान्यपणे हायट्रोफोबिक फिल्मचा थर चढवला जातो. जे मुख्यता प्लास्टिकचे बनलेले असतात. याच्या मदतीने कपात तरल पदार्थ टिकून राहतात. हा थर गरम पाणी टाकल्यावर १५ मिनिटांच्या आत वितळू लागतो’.
सूक्ष्म कणांचे आरोग्यावर गंभीर परिणाम
सुधा गोयल यांनी सांगितले की, आमच्या रिसर्चनुसार एका कपात १५ मिनिटांसाठी १०० मिली गरम तरल पदार्थ ठेवल्याने २५ हजार मायक्रोन आकाराचे प्लास्टिकचे सूक्ष्म कण विरघळू लागतात. म्हणजे रोज तीन कप चहा किंवा कॉफी प्यायल्याने व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे ७५ हजार सूक्ष्म कण जातात. हे कण डोळ्यांनी दिसत नाहीत. पण याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






