प्रतिनिधी | अमळनेर
येथून जवळच असलेल्या निम येथील माहेर असलेल्या विवाहितेने धुळेच्या सासरच्या मंडळींविरुद्ध छळ केल्याची तक्रार दिल्याने सहा जणांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ करून जिवेमारण्याची धमकी देत हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की, निम येथील पूजा हीचा विवाह धुळे येथील शिवम याच्यासोबत झाला होता.
लग्नाच्या तीन महिन्यानंतर सासरच्या मंडळींनी हुंडा कमी दिला, मानपान केला नाही म्हणून छळ सुरू केला. तसेच घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये घेवून ये असा तगादा लावला. त्यानतंर पतीने २७ ऑगस्ट २२ रोजी विवाहितेला माहेरी निम येथे आणून सोडले.

महिला सहायता कक्ष, जळगाव यांच्यामार्फत वाद मिटत नसल्याने विवाहितेने मारवड पोलीसात पती शिवम पाटील, सासरा नंदकिशोर पाटील, सासू बन्सुबाई पाटील, दिर मनीष पाटील, मामसासरे संभाजी पवार, मावससासू सुपाबाई पाटील यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यावरून मारवड पोलीसात भा. द. वि. कलम ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार मुकेश साळुंखे हे करीत आहेत.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






