दरवाज्याची कडी खोलून ३५ हजाराचा ऐवज केला लंपास, निंभोरा येथील घटना, पोलीसात तक्रार दाखल.

Spread the love

अमळनेर:- तालुक्यातील निंभोरा येथे मागच्या दरवाज्याची कडी खोलून घरात प्रवेश करत ३५ हजाराचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असून याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर आसाराम पाटील रा. निंभोरा यांच्या घरात दिनांक २४ रोजी रात्री १०:३० ते २५ च्या पहाटे ४:३० दरम्यान अज्ञात चोरट्याने मागील दाराने प्रवेश करत

गोदरेज कपाटातून दागिने, देवघरातील सोन्या चांदीचे शिक्के, फिर्यादीच्या खिशातील रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत भादवि कलम ३८०, ४५७ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हवालदार सुनील अगोने हे करीत आहेत.

हे पण वाचा

टीम झुंजार