सोयगाव, ता.२६ (साईदास पवार) तालुक्यातील बहुलखेडा गावात ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित झाल्या मुळे बहुलखेडा गावात दहा दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांसह चिमुकल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने ग्रामपंचायत विरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.बहुलखेडा गावास मुबलक पाणी साठा उपलब्ध असून महावितरण ने थकबाकी पोटी पाणी पुरवठा यंत्रणेच्या वीज पुरवठा खंडित केल्या चे ग्रामपंचायत कडून सांगण्यात येत आहे
दहा दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा केला जात नसल्याने महिलांसह चिमुकल्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील प्रतिष्ठित इब्राहिम देशमुख यांनी दि.२४ शुक्रवारी ग्रामसेवक यांना गावाला पाणीपुरवठा करण्यास काय अडचण आहे असे विचारले असता, महावितरणने वीजपुरवठा खंडित केला आहे असे सांगितले. त्यावर देशमुख यांनी ग्रामसेवकास मागील वसुली, फेरफार पोटी जमा झालेली रक्कम, यातून वीजबिल भरून गावास पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले मात्र ग्रामसेवकाने यावर उत्तर दिले नाही असे डॉ इब्राहिम देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे गावास पाणीपुरवठा केंव्हा सुरळीत होईल हा प्रश्न मात्र निरुत्तरीत आहे.

चौकट-
ऐन रखरखत्या उन्हात बहुलखेडा गावात महिलांना व चिमुकल्याना डोक्यावर हंडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे आधीच उन्हाची तीव्रता अन त्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती यामुळे पायांना चटके सोसून महिलांना पिण्याच्या पाणी आणावे लागत आहे बहुलखेडा गावात या निर्माण झालेल्या कृत्रिम पाणी टंचाई कडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला आहे…..
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






