बेलाचं पानं भगवान शंकरांना प्रिय असल्यानं शंकराच्या पिंडीवर हे बेलपत्र चढवलं जातं. बेलपत्र खाल्ल्यानं तब्येतीलाही अनेक फायदे मिळतात. यामुळे तुमच्या अनेक समस्या दूर केल्या जाऊ शकतात. आयुर्वेदानुसार बेल पत्रात असे काही गुण असतात जे आपल्या शरीराला भरपूर फायदे देतात. म्हणून बेलाच्या पानाचे नियमित सेवन करणं गरजेचं आहे.
महाशिवरात्रीला (Mahashivratri 2023) शिव-शंकराला बेलपत्र अर्पण करा, पण प्रसाद म्हणून अवश्य खा. यामुळे अनेक प्रकारचे फायदे मिळतात. बेलपत्रामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि पौष्टिक घटक असतात. त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी,रिबोफ्लेविन, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन बी1, बी6, बी12 इत्यादी आवश्यक गोष्टी असतात.
शुगर नियंत्रणात राहते
बेलाची पाने रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. यामध्ये रेचक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात, जे पुरेसे इन्सुलिन तयार करण्यात मदत करतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. आयुर्वेदाचार्यांशी सल्लामसलत केल्यानंतर ते सेवन केले जाऊ शकते.
पोट साफ होतं
बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास वेलाची पाने खावीत. बेलची पाने थोडे मीठ आणि मिरपूड चघळल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. असे म्हटले जाते की ते आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
पचनक्रिया चांगली राहते
बेल पोट साफ करण्याचे काम करते. यात रेचक गुणधर्म आहेत जे पाचन तंत्र मजबूत करतात. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर बेल किंवा बेलची पाने खा.
पहा व्हिडिओ :
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






