मुलीने प्रपोज नाकारला ; पीडित मुलगी आंघोळ करत असताना तरुणाने केलं धक्कादायक कृत्य

Spread the love

अमरावती : कोण आपलं प्रेम कशाप्रकारे व्यक्त करेल याचा काही नेम नाही. अशीचं एक धक्कादायक आणि संतापजनक घटना अमरावती भातुकली तालुक्यातील एका खेडेगावात घडली आहे.तरूणीने तरूणाचा प्रपोज नाकारल्यानंतर त्याने संतापजनक कृत्य केलं आहे.
पीडित मुलीने प्रपोज नाकाऱ्यानंतर संबंधित तरूणी आंघोळ करत असताना आरोपी तरूण चक्क तिच्या बाथरूममध्ये डोकावला.

तिला तो दिसतात पीडित तरूणी जिवाच्या आकांताने ओरडली. त्यामुळे तिच्यावरील बाका प्रसंग टळला. या प्रकरणी नवल नामक (वय २१) या तरूणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सकाळच्या सुमारास पीडित तरूणी आंघोळ करत असताना आरोपी नवल हा अचानक बाथरूमच्या दरवाजा ढकलून आत डोकावला. त्याला अशा प्रकारे त्याला बघून ती घाबरली आणि जोराने ओरडली.

त्यादरम्यान “प्लीज कॉल कर”, असं सांगून तो तेथून निघून गेला.
ही बाब पीडित तरुणीने आरोपीच्या भावाला सांगितली आणि तिने वलगाव पोलिस ठाणे गाठले. तेथे महिला पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून आरोपी नवलविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार