Viral Video: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग म्हणून ओळखले जाते. सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामध्ये कधी पती पत्नींमधले प्रेम दिसते, तर कधी दोघांमध्ये जुंपलेली जुगलबंदी पाहायला मिळते.सध्या सोशल मीडियावर अशाच एका जोडप्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये पती पत्नी दोघेही आपल्या घराच्या गॅलरीमध्ये भांडताना दिसत आहेत, मात्र त्यांचा हा वाद इतका टोकाला जातो की, दोघांचाही जीव धोक्यात येतो. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागची संपूर्ण कहाणी, चला जाणून घेवूया…. (ViralVideo)
पती पत्नीच्या नात्यात वाद, विवाद हे नित्याचेच पाहायला मिळतात. मात्र कधी कधी त्यांचा हा वाद असा रौद्ररुप धारण करतो, जे दोघांच्याही जीवावर बेतू शकते. सध्या अशाच एका पती पत्नीच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे भांडता भांडता त्यांच्या गॅलरीतून थेट खाली कोसळतात. हा व्हिडिओ रशियाच्या सेंट पीटर बर्गचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार हा व्हिडिओ जुना असून तो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. व्हिडिओच्या वेळेची पुष्टी झालेली नाही परंतु हा खरोखर धोकादायक व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दोघेही भांडताना वरून खाली पडतात. हा व्हिडीओ बघून हसावं की रडावं असा तुम्हाला प्रश्न पडेल.या व्हिडिओच्या सुरुवातीला दोघेही जोरजोरात भांडताना दिसत आहेत.
यावेळी बाल्कनीचे रेलिंग तुटते आणि दोघेही रेलिंगवरून खाली पडतात. इतकंच नाही तर दोघंही इतक्या वेगाने पडतात की जोराचा आवाज होतो. ते दोघे इतक्या जोरात खाली कोसळतात की, पडल्यानंतर दोघेही बेशुद्ध झालेले दिसत आहेत. तिथून जाणाऱ्या एका पादचाऱ्याने हा सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि नंतर व्हायरल केला.दरम्यान, या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. ज्यामध्ये त्यांनी भांडणाऱ्या दोघांनाही ही शिक्षा असल्याचे सांगितले आहे, तर काही नेटकऱ्यांनी थेट व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तिवर निशाणा साधत व्हिडिओ काढण्यापेक्षा मदत करायला धावायला हवं होते, असा सल्ला दिला आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचीही माहिती समोर येत आहे..

या दोघांविरोधात चालणार खटला-
बरं आता हे सारं वाचून तुम्हाला या दोघांबद्दल सहानुभूती वाटत असली तर आता या दोघांविरोधातच खटला चालवला जाणार आहे. यामागील कारण म्हणजे ज्या बाल्कनीचं नुकसान या दोघांच्या भांडणामुळे झालं आहे ती इमारत 1883 साली उभारण्यात आलेली इमारत असून सध्या एक ऐतिहासिक इमारत म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच ऐतिहासिक इमारतीला नुकसान पोहचवल्याने या दोघांविरोधात खटला चालवला जाणार आहे.

दोघांनाही गंभीर दुखापत-
ही महिला पुरुषाला मारताना बाल्कनीच्या रेलिंगवर भार देते. त्यामुळे हे रेलिंग तुटतं आणि ही महिला या पुरुषासहीत दुसऱ्या मजल्यावरुन खाली फुटपाथवर पडते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पत्नी काँक्रिटच्या ढिगाऱ्यावर पडल्याची आणि पती फुटपाथवर पडल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या दोघांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. मात्र इमारतीची पडझड झाल्याने या दोघांविरोधात खटला चालवला जाणार असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. या दोघांच्या हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. दोघांचेही हात आणि पाय फ्रॅक्चर झाले आहेत.






