जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
वयाने लहान असणार्या लोकांशी मैत्री कराल. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. कामाचे योग्य नियोजन कराल. जोडीदाराच्या साथीत रमून जाल. इतरांना सहृदयतेने मदत कराल.
वृषभ :-
व्यावसायिक ज्ञान वाढवाल. लेखक, प्राध्यापक यांना प्रगती करता येईल. व्यवहारी हजरजबाबीपणा दाखवाल. हुशारीने स्वत:च फायदा काढून घ्याल. योग्य कल्पकता दाखवाल.
मिथुन :-
कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण राहील. तुमच्या वक्तृत्वावर लोक खुश होतील. धोरणीपणे वागणे ठेवाल. काही गोष्टींची शिस्त बाळगावी लागेल. प्रवासाची आवड पूर्ण कराल.
कर्क :-
भावंडांच्या वागण्याचा सखोल विचार कराल. मेंदूला जरासा ताण द्यावा लागेल. कफाचे त्रास संभवतात. अति विचारात वेळ वाया जाईल. योग्य अनुमान काढावे.
सिंह :-
पत्नीची व्यवहार कुशलता दिसून येईल. जोडीदाराच्या सुस्वभावीपणाचे कौतुक कराल. मानसिक स्थिरता जपावी. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. विरोधकांवर मात करता येईल.
कन्या :-
फसवेपणाचा आधार घेऊ नका. इतरांच्या विश्वासास पात्र व्हावे. जुनी भांडणे उकरून काढली जातील. कोणाचाही सल्ला चटकन मान्य करू नका. अविचाराने त्रास वाढू शकतो.
तूळ :-
बौद्धिक क्षेत्रात काम करणार्यांना दिवस चांगला जाईल. खोट्या गोष्टींचा विरोध करावा. घरगुती शांतता जपावी. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. वाहन वेगावर नियंत्रण ठेवा.
वृश्चिक :-
संभाषणात बाजी माराल. नवीन मित्र जोडले जातील. जवळचे नातेवाईक भेटतील. तुमच्यातील प्रेमळपणा दाखवून द्यावा. भावंडांचे वागणे विरोधी वाटू शकते.
धनू :-
तुमच्यातील अहंमन्यता वाढू देवू नका. मनाची चलबिचलता सांभाळावी. काही खर्च आटोक्यात ठेवावेत. वैचारिक चलाखी दाखवाल. नवीन गोष्टीत रुची दाखवाल.
मकर :-
स्थिर विचार करावेत. बोलतांना सावधगिरी बाळगावी. कलेसाठी वेळ काढाल. धार्मिक ठिकाणी मदत कराल. गैरसमजातून वाद वाढू देवू नका.
कुंभ :-
गोष्टींचे आकलन चटकन होईल. बुद्धि चातुर्याने वागाल. स्मरणशक्तीचा चांगला फायदा होईल. अभ्यासूपणे गोष्टी जाणून घ्याल. हसत-हसत संभाषण कराल.
मीन :-
उत्तम व्यावसायिक लाभ होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. बढतीचा योग येईल. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. उधारीचे व्यवहार तूर्तास टाळावेत..
हेही वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






