वार्षिक स्नेहसंमेलनात “लाफ्टर का डाॅक्टर, काॅमेडी का चाप्टर” ने केली एरंडोल शहरात धमाल,कार्यक्रमाने श्रोते मंत्रमुग्ध

Spread the love

एरंडोल :- येथील बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे ११ वे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा उत्साहात पार पडला.यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाटीका,गायन इ.कलागुणांचे पालकांनी व उपस्थित श्रोत्यांनी तोंडभरून कौतुक केले.
गुरुकुल प्रतिष्ठान साळवा संचलित, बचपन व ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मा. डॉ. हर्षलजी माने, एरंडोल पो.स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक श्री गणेशजी अहिरे, माजी नगरसेवक तथा दिव्य मराठीचे पत्रकार मा.श्री संजूभाऊ चौधरी आणि “लाफ्टर का डॉक्टर,काॅमेडी का चाप्टर” म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे खान्देशचे सुपूत्र, काॅमेडीयन तथा हिंदी मराठी चित्रपट, सिरीयल कलाकार मि. विलासकुमार शिरसाठ व संस्थेचे प्रेरणास्थान मा.प्रा.श्री प्रमोदजी पाटील , त्यांच्या सुविद्य पत्नी मा.प्राचार्या प्रा.सौ. सुरेखाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांनी राष्ट्रध्वजास राष्ट्रगीत म्हणून सलामी दिली .व दीपप्रज्वलन करून सरस्वती पूजन केले आणि स्नेहसंमेलन उद्घाटन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वर्षभरातील विविध एक्टीव्हीटीज व स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांना विविध पारितोषिक व मेडल्स देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थी व शाळा प्रशासन यांच्यात दुवा म्हणून विशेष काम करणा-या पालकांचा व वर्षभरातील उत्कृष्ट काम करणा-या शिक्षकांचादेखील सत्कार करण्यात आला.

मा. डाॅ हर्षलजी माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील विविध स्पर्धांचे महत्त्व स्पष्ट करून एकनिष्ठ व नैतिकतेचे महत्त्व समजावून सांगितले. संस्थेचे सर्वेसर्वा मा.श्री प्रमोद पाटीलसर यांनी स्नेहसंमेलनाचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व स्पष्ट केले अभ्यासा पेक्षाही कलागुणांना कीती महत्व असते ते उदाहरण देऊन पटवून दिले.तसेच शाळेच्या प्राचार्या मा.प्रा.सौ. सुरेखा पाटील मॅडम यांनी पालक व विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून अनमोल असे जिवनदायी मार्गदर्शन केले .

कार्यक्रमाला पालकांची मोठी उपस्थिती होती.तसेच कलाकार विलास कुमार शिरसाठ यांच्या कॉमेडी व डबिंग व्हाईस मिमिक्री अभिनयाने श्रोत्यांचे मनोरंजन जिंकून घेतले. मा.प्रा.प्रमोद पाटील व प्रा.सौ.सुरेखा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन इ.८ – ९ वी ची विद्यार्थीनी व विद्यार्थी कु.जयश्री महाजन व कु.शुभम चौधरी यांनी केले.शेवटी आभारप्रदर्शन सौ.वेदांती मॅडम यांनी आपल्या गोड शब्दांनी केले.

हे पण वाचा

टीम झुंजार