एरंडोल l प्रतिनिधी
एरंडोल- भरधाव वेगाने येणा-या डंपरने समोरून येत असलेल्या मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील एक जन जागीच ठार झाला तर एक जन किरकोळ जखमी झाला.हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास म्हसावद रस्त्यावरील निखील पेट्रोलपंपासमोर झाला.अपघातग्रस्त डंपरचालक वाहन सोडून फरार झाला.याबाबत माहिती अशी,कि
कल्याणे खुर्द (ता.धरणगाव) येथील अमोल श्रावण पाटील हे वडील श्रावण दगा पाटील यांचेसह मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९ ए.झेड.११२१ ने पाचोरा तालुक्यातील दहीगाव संत येथे नातेवाईकाच्या गंधमुक्तीच्या कार्यक्रमासाठी जात होते.म्हसावद रस्त्यावर असलेल्या निखील पेट्रोल पंपावर मोटरसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असतांना म्हसावद कडून भरधाव वेगाने येणा-या डंपर क्रमांक एम.एच.१५ एफ.व्ही.७७०७ ने मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत श्रावण दगा पाटील हे डंपरच्या पुढील चाकात सापडल्यामुळे डंपर त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर पेट्रोलपंपावरील कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी श्रावण पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले.अपघातानंतर डंपरचालक डंपर अपघातस्थळी सोडून फरार झाला.

याबाबत अमोल श्रावण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.मयात श्रावण पाटील यांचे पच्छात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.नातेवाईकाच्या गंधमुक्ती कार्यक्रमास जाणा-या पितापुत्राचा अपघात होऊन पित्याचा जागीच मृत्यू झाल्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






