सोयगावच्या आमखेड्यातील नवीन देशी दारू दुकाना विरोधात महिलांनी रणशिंग फुंकले;सोयगाव तहसील वर धडकला महिलांचा मोर्चा

Spread the love

सोयगाव,(साईदास पवार).शहरातील आमखेडा भागातील मंजुरी मिळालेल्या देशी दारूच्या त्या नवीन दुकानाविरोधात शेकडो महिलांनी रणशिंग फुंकून सोमवारी( दि.२७) नवीन देशी दारू दुकानांची परवानगी नाकारण्यात यावी यासाठी थेट तहसील वर भव्य मोर्चा काढला या मोर्चा द्वारे संतप्त महिलांनी या देशी दारू दुकानांची परवानगी रद्द न झाल्यास त्या दुकानात तोडफोड करण्यात येईल व होणाऱ्या अनार्थस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला आहे…महिलांच्या या इशाऱ्यामुळे तालुका प्रशासनाला हादरा बसला आहे…

तालुका व शहराची शासकीय कार्यालय असलेल्या वर्दळीच्या भागात सोयगाव- बनोटी रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर येथील स्थलांतरित झालेले देशी दारूचे सुरू होणारे दुकानास शासनाने परवानगी देऊ नये या मागणीसाठी विमलबाई खैरनार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी संतप्त महिलांनी चक्क या देशी दारुच्या नवीन दुकानमुळे आमचा संसार उघड्यावर आणू नका अशी आग्रही मागणी दिलेल्या निवेदनात केली आहे.या देशी दारूच्या दुकानाला विरोध करण्यासाठी शेकडो महिलांनी सोयगाव तहसील कार्यालयावर घोषणाबाजी करीत मोर्चा काढला. एक ते दीड तास प्रशासनास धारेवर धरले.

यावेळी अव्वल कारकून आशिष औटी यांनी महिलांचे निवेदन स्वीकारून पूढील कारवाईसाठी वरिष्ठ जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी विमालबाई खैरनार,कालाबाई गायकवाड, अनिता लहाने, बिलकीसबी शेख,सैनात शेख,वत्सलाबाई साळवे, सुनीता साळवे,राशिदा बी शेख,अमिना शेख,आदींसह शेकडो महिला तहसील कार्यालयात धडकल्या होत्या यावेळी संजय चौधरी, ग्राम पंचायत सदस्य मोतीराम फूसे, संतोष भामरे,रामा एलिस, प्रहार संघटनेचे संदीप इंगळे,, ज्ञानेश्वर गाडेकर, अनिल लोखंडे,सुनील आगे यांच्यासह शेकडो महिलांची उपस्थीती होती.

चौकट :
तहसील कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर बैठ्या आंदोलनात झाल्यावर महिला मंडळाच्या अध्यक्ष विमलबाई खैरनार यांनी जर प्रशासनाने देशी दारू दुकानास परवानगी दिली तर संतप्त महिला दुकानाची तोडफोड करून दारू सोनानदीत फेकतील असा गंभीर इशारा दिला.
आमखेडा भागात सोयगाव- बनोटी रस्त्यावर तहसील कार्यालय, उप अधीक्षक सिटी सर्व्हे कार्यालय,, वनक्षेत्रपाल कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालय, लघु पाटबंधारे कार्यालय, ग्रामीण रुग्णालय सोयगाव आदी कार्यालय आहेत. या कार्यालयात तालुक्यातील खेडेगावातून लोक आपली कामे घेऊन येतात. त्यामुळे हे वर्दळीचे ठिकाण असल्याने येथे हे नवीन देशी दारूचे दुकान होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने परवानगी रद्द करावी असे महिलांचे म्हणणे आहे या ठिकाणी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धार्मिक स्थळे असून या ठिकाणी महिलांची वर्दळ असल्याचे निवेदनात नमूद आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार