जीपीएसच्या बाल वैज्ञानिकांचे अनोखे विज्ञान प्रदर्शन

Spread the love

धरणगाव ( पाळधी ) :- भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी आज दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


सदर विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी जीपीएस कॅम्पसचे कार्यकारी संचालक माननीय श्री विक्रम गुलाबरावजी पाटील सर,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री डी.डी. कंखरे सर,बांभोरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री संजय शिरसाट सर,रिंगणगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री महाजन सर, एमटीपी उर्दू विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री.मुस्ताक सर, भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य श्री सचिन पाटील, श्री शरद ठाकूर सर,श्री डी.डी बोरसे सर, जीपीएस कँपस मधील विज्ञान शिक्षक श्री के.टी.पाटील सर, इंग्रजी विभागाच्या हुस्ना पटेल मॅम व जीपीएस कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


इयत्ता चौथी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे विज्ञान उपकरणे सादर करून आपल्यातल्या बाल वैज्ञानिकाच्या परिचय करून देत अनोख्या पद्धतीने राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला.


सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीपीएस परिवारातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार