पारोळा – आज दि.27/02/2023 रोजी शालेय आवारात व संस्थेचे अध्यक्ष दादासो समीर पाटील यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रसंगी दादासो समीर पाटील यांच्या हस्ते या शैक्षणिक वर्षात वकृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,रांगोळी ,क्रिडा,निबंध स्पर्धा मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तसेच इ.10वी च्या विद्यार्थ्यांनी शाळेला डिजिटल शिक्षणासाठी प्रोजेक्टर भेट दिले असता अध्यक्ष दादासो समीर पाटील यांनी मनोगतातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले व भविष्यातील वाटा या विषयावर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
मुख्याध्यापक श्री पी.आर.पाटील यांनी प्रास्तविक केले सुत्रसंचालन श्री आर.जी.पाटील यांनी केले आभार प्रर्दशन श्री आर.डी.साळुंखे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री एन.आर.चौधरी,एस.आर.सोनवणे,पी.के.पाटील ,जी.बी.पाटील ,एस.एन.पाटील ,एस.एस.पिले,के.एस.पाटील यांनी परिश्रम घेतले.शेवटी स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






