एरंडोल :- तालुक्यातील टोळी खुर्द ता. एरंडोल येथील नवरीस हळद लावण्यासाठी करमाड तालुका पारोळा येथे घेऊन जाण्यासाठी गाडी आली. नवरी मुलगी मोबाईलवर बोलत बोलत घराच्या बाहेर निघाली आणि जवखेडा रस्त्यावरील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की अनिल पवार रा. टोळी तालुका एरंडोल येथे शेती व मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचा लहान भाऊ विजय पवार हे मयत झाल्याने त्यांच्या घराशेजारीस भावजयी व त्याची 18 वर्षीय मुलगी गायत्री विजय पवार व मुलगा भोलानाथ विजय पवार हे राहतात
गायत्री पवार या 18 वर्षीय पुतणीचे करमाड तालुका पारोळा दिनांक 28 फेब्रुवारी रोजी लग्न असल्यामुळे या नवरी मुलीस घेण्यासाठी करमाड येथून टोळी येथे सकाळी दहा वाजेच्या सुमारास घेण्यासाठी आली होती. दिनांक 27 तारखेला सायंकाळी पाच वाजता या मुलीस हळद लागणार होती. लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती सर्व नातेवाईकांना पत्रिका वाटप करण्यात आल्या होत्या घरात आनंदाचे वातावरण होते. नवरी मुलीस घेऊन जाण्यासाठी गाडी आली पाहुणे आले त्यांना चहापाणी झाली जेवण करून नवरी घेऊन जा असं सांगण्यात आले

हे सर्व नवरी मुलीने पाहिले आपला मोबाईल फोन उचलला बोलत बोलत घराच्या बाहेर निघून जवखेडा रोड कडे जाताना गावातील अर्जुन जयराम यांनी सांगितले म्हणून गावातील चुलत भाऊ संजय पवार व विनोद भिल अजून असे दोघे जवखेडा रोडने पहात पहात जात असताना वासुदेव कासार यांच्या विहिरी जवळ गेले असता त्या ठिकाणी मोबाईल दिसला म्हणून त्यांनी विहिरीत पाहिले असता गायत्री पवार ही मुलगी पाण्यात तरंगताना दिसली गावातील अन्य नातेवाईकांना फोन लावून त्या ठिकाणी बोलावून तिला विहिरीचा बाहेर काढून औषधोपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले तेथील डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे घोषित करण्यात आले.

हळदीच्या दिवशी या होणाऱ्या नवरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रवींद्र वाघ हे पुढील तपास करीत आहे. दरम्यान लग्नासाठी वधू-वरांच्या नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते त्यांच्या या आनंदावर दुःखाचे विरजण पडले. आनंदाचे वातावरण काही वेळातच दुःखात बदल झाले. काही दिवसांपूर्वीच काही दिवसापूर्वीच टोळी येथे साखरपुडा झाला होता सर्वत्र आनंदी वातावरण होतं नवरी मुलगी ही घरातून मोबाईल फोनवर बोलत निघाली हा शेवटचा फोन कोणाचा व काय बोलली, व तिने आत्महत्या का केली असेल अशी दिवसभर चर्चा सुरू होती. आत्महत्येचे कारण समजु शकले नाही.
हे पण वाचा
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






