Viral Video: एका तरुणासाठी भिडल्या दोघी, तरुणींच्या हाणामारीचा व्हिडियो होतोय तुफान व्हायरल

Spread the love

यवतमाळ : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होऊ लागेल याचा काही नेम नाही, आता हेच पाहा सोशल मीडियावर दोन मुलींच्या भांडणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.या व्हिडीओची सोशल मीडियावर जी काही चर्चा सुरु आहे की बस्स…. लोक या व्हिडीओवर कमेंटवर कमेंट करत आहेत आणि या मागचं कारणं ही तसंच आहे, या व्हिडीओमधील तरुणी एका मुलासाठी भिडल्या आहेत.

हा व्हिडीओ यवतमाळमधील असल्याचे सांगितले जात आहे. येथीस शिवाजीपार्क हे लव्हर्स पॉइंट बनलं आहे आणि तेथील हा व्हायरल व्हिडीओ आहे.शिवाजी पार्कमध्ये दोन तरुणींची एका तरुणामुळे जोरदार भांडण झाले. एक तरुण दोन मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण अचानक जेव्हा दोन्ही मुली समोरासमोर आल्या आणि त्याचं भांडं फुटलं. त्यानंतर या दोन्ही मुलींमध्ये भांडण सुरू झाले. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले.

याच हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.


व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या दोन्ही तरुणी महाविद्यालयीन विद्यार्थिनी असल्याचे दिसत आहे. या मुली एकमेकांचे केस ओढून, लाथा-बुक्क्यांनी एकमेकांसोबत भिडल्या आहेत. मुलींनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली आहे. ही हाणामारी पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली, तेव्हाच तेथील उपस्थीतांपैकी कोणीतरी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार