जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष :-
तुमच्या व्यक्तिमत्वाची उत्तम छाप पडेल. व्यापारी वर्गाला चांगला आर्थिक लाभ होईल. नवीन मित्र जोडाल. झोपेची तक्रार जाणवेल. तरुण वर्गात अधिक वेळ घालवाल.
वृषभ :-
व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. व्यावहारिक कल्पकता वापराल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधवा लागेल. काही बाबी उघडपणे बोलणे टाळाल. अधिकारी व्यक्तींची गाठ घ्यावी लागेल.
मिथुन :-
मनातील आकांक्षा पूर्ण होतील. चांगली संगत लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्या लोकांच्या संगतीत वावराल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल.
कर्क :-
मानसिक ताणापासून दूर राहावे. घरातील वडीलधार्या व्यक्तींचे मत विरोधी वाटू शकते. अंगीभूत कलागुण विकसित होण्यास वाव द्यावा. अति विचार करणे टाळावे. पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात.
सिंह :-
जोडीदाराशी विचार-विनिमय कराल. भागीदारीत नवीन योजना आमलात आणाल. मुलांच्या हट्टीपणा कडे लक्ष ठेवा. तुमच्यातील धार्मिकता वाढीस लागेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.
कन्या :-
पत्नीची प्रगती होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. सर्दी, खोकला यांसारखे त्रास संभवतात. जुगारातून लाभ संभवतो. गुंतवणुकीचा नवीन पर्याय शोधाल.
तूळ :-
पत्नीचा वरचष्मा राहील. जोडीदाराचा लाडिक हट्ट पुरवावा लागेल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळचा प्रवास जपून करावा. कामाचा जोम वाढेल.
वृश्चिक :-
बोलतांना सारासार विचार करून बोलावे. कसलाही उतावीळपणा करायला जाऊ नये. कौटुंबिक खर्चाचे योग्य नियोजन करावे. घरात नातेवाईक जमा होतील. दिवस हसत-खेळत घालवाल.
धनू :-
रागाचा पारा आवरता घ्यावा लागेल. आततायीपणे वागू नये. कामाचा जोम वाढीस लागेल. काही अनपेक्षित बदल संभवतात. नातेवाईकांशी मतभेदाची शक्यता आहे.
मकर :-
सामुदायिक गोष्टीपासून दूर राहावे. स्त्रीवर्गापासून सावधानता बाळगावी. धार्मिक यात्रा कराल. प्रवासात सावधानता बाळगावी लागेल. वादविवादात सामील होणे टाळा.
कुंभ :-
मनमोकळ्या गप्पा मारता येतील. तुमच्या संभाषण कौशल्यावर सर्व खुश होतील. व्यावहारिक चातुर्य दाखवून द्याल. कौटुंबिक जबाबदारी पेलाल. हातातील कला जोपासावी.
मीन :-
वेळेचे महत्व जाणून वागावे. कोणालाही शब्द देतांना विचार करावा. व्यावसायिक लाभाचे योग्य नियोजन करावे. चटपटीत पदार्थ खाल. आवडी-निवडी बाबत दक्ष राहाल.
हेही वाचलंत का ?
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
- शहापूर चोरीच्या घटनेतील आरोपी जामनेर पोलिसांनी शोधला ; – जामनेर पोलीसांची यशस्वी कामगिरी
- पाच मुलांच्या आईचे सूत जुळले 20 वर्षे लहान तरुणासोबत,दोघे राहिले लिव्ह-इन-रिलेशनमध्ये,तिला आठवणी आली पतीची, अन् भररस्त्यात…..
- अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या धरणगाव तालुकाध्यक्षपदी विनायक महाजन यांची नियुक्ती






