नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महास्वच्छता अभियानात एरंडोल येथे 32 टन 400 किलो कचऱ्याचे संकलन

Spread the love

एरंडोल :- येथे दिनांक 1मार्च रोजी महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त महास्वच्छता अभियानची सुरुवात तहसीलदार सुचिता चव्हाण यांच्या हस्ते मरिमाता चौक पासून सुरुवात करण्यात आली. महास्वच्छता अभियानसाठी श्री बैठकीचे एरंडोल, कासोदा,आडगाव, तळई, पिम्प्री,खडके, रिंगणगाव,टोळी या तालुक्यातील गावातून 494 श्रीसदस्यांनी आपला सहभाग नोदवुन स्वच्छ्ता केली व ओला कचरा व सुका कचरा मिळून 32 टन 400 किलो कचऱ्याचे संकलन करून नगरपालिकेच्या कचरा डेपो येथे सपूर्थ करण्यात आला.

मरी माता मंदिरापासून स्वच्छता महाअभियानाची सुरुवात करून सर्व शासकीय कार्यालयातील प्रांगण, स्मशानभूमी, शहरातील मुख्य रस्ते कचरा मुक्त करण्यात आले या महास्वच्छता अभियान अंतर्गत 21टन 900 किलो सुका कचरा व 10 टन 500 किलो ओला कचरा असे एकूण 32 टन 400 किलो कचरा गोळा करण्यात आला. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी स्वच्छता अभियानाच्या या कार्यक्रमामुळे सर्व श्री सदस्यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले.

चौकट :- शहरात किती श्रीसदस्यांनी संकलन केला कचरा
मरी माता मंदिर ते जी डी सी सी बँक 1.3 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 54 सदस्यांनी 7.40 टन कचरा गोळा केला
बस स्थानक ते लक्ष्मी नगर दीड किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 55 सदस्यांनी 1 टन कचरा गोळा केला
सावता माळी मढी ते विश्राम गृह 1.5 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 71 सदस्यांनी 5 टन कचरा गोळा केला.
स्मशानभूमी ते महात्मा फुले पुतळा 1.25 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 46 सदस्यांनी 1 टन कचरा गोळा केला
भगवा चौक ते अमळनेर दरवाजा 1 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 21 सदस्यांनी 3 टन कचरा गोळा केला

भावसार गल्ली ते जय गुरु व्यायाम शाळा चौक 1.25 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 32 सदस्यांनी 1.50 टन कचरा गोळा केला
श्रीराम मंदिर ते परदेसी गल्ली 1.25 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 62 सदस्यांनी 3 टन कचरा गोळा केला
म्हसावद नाका ते वन ऑफिस कार्यालय 1.5 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 47 सदस्यांनी 3 टन कचरा गोळा केला
म्हसावद नाका ते बीएसएनएल कार्यालय 1.25 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 57 सदस्यांनी 3 टन कचरा गोळा केला
न्यायालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, भूमी अभिलेख कार्यालय या परिसराच्या 1 किलोमीटर अंतराच्या या परिसरासाठी 49 सदस्यांनी 4.5 टन कचरा गोळा केला
एकूण 32.400 टन ओला व सुका कचरा नगरपालिकेच्या कचरा डेपोवर टाकण्यात आला.

हे पण वाचा

टीम झुंजार